नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पसंती मिळालेल्या वेब सीरिजपैकी एक असणाऱ्या ‘मनी हाइस्ट’ला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. थरारक, अभूतपूर्व, अविस्मरणीय अशा प्रकारची ही सिरीज आहे. ही स्पॅनिश सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यातलं ‘बेला चाओ’ हे गाणं खूप प्रसिद्ध झालेलं आहे.या गाण्याचे अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले जाऊ शकतात. बेला चाओची क्रेझ इतक्या लोकांना आहे की आता त्याच गुजराती व्हर्जनही आलं आहे. गुजरातच्या एका समारंभात हे देसी शैलीमध्ये सादर केले गेले.
गुजरातमध्ये बेला चाओचे देसी सादरीकरण हारमोनियम, तबला आणि मंजीरा सारख्या भारतीय वाद्यासह झाले. गुजराती ट्विस्टने या गाण्याने लोकांना चकित केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच लगेच व्हायरल झाला.काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले आहे की स्पॅनिश गाण्याची गुजराती व्हर्जन मूळ बेला चाओ गाण्यापेक्षा चांगले आणि मजेदार आहे.फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत ३१,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओमध्ये, प्रेक्षक गाण्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.
मुंबई पोलिसांनीही केली खास पोस्ट
यापूर्वी, मुंबई पोलिसांनी ‘मनी हाइस्ट’ या लोकप्रिय शोमधील एक क्लिप वापरून ऑनलाइन सुरक्षा सल्ला जारी केला होता. ती पोस्ट अपलोड केल्यानंत पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक जण या ट्विटमुळे प्रभावित झाले, तर काहींनी वेगवेगळ्या प्रकारे मीम्सद्वारे प्रतिक्रिया दिल्या होत्या.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे “वेगवेगळी खाती, वेगळा पासवर्ड, तुमचा पासवर्ड.” या ट्विटचा उद्देश लोकांना त्यांच्या सर्व खात्यांसाठी समान पासवर्ड नसण्याची चेतावणी देणे होता.