कोको स्टुडिओ भारतचे अंचिंत आणि आदित्य गढवी यांनी गायलेले खलासी हे गाणे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना हे गाणे प्रंचड आवडले होते. नवरात्रीमध्ये अनेकजण या गाण्यावर थिरकाना दिसत आहे. आता खलासी गाण्याचे एक हिंदी व्हर्जन व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. लोकांना हे हिंदी व्हर्जनमधील खलासी गाणे देखील आवडले आहे. लोकांनी खलासी या गाण्याचे पूर्ण हिंदी व्हर्जन रिलीज करण्याची विनंती केली आहे.
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडिओ जीसुस मेहताने ( jesusmehta ) शेअर केला आहे. ‘खार्वो खलासी गोती लो या गाण्याचा नक्की अर्थ काय हे सांगण्यासाठी हे गाणे तयार केले आहे. “@KokeStudioBharat च्या ट्रेंडिंग गाण्याचे ( खारवो खलासी गोती लो) हिंदी व्हर्जन. सर्वांना समजेल की @adityagadhviofficial ने किती अप्रतिम गाणे गायले आहे. यासाठी या गाण्याचा अर्थ सांगितला आहे” असे कॅप्शन त्यांनी व्हिडीओसह शेअर केले आहे.
हेही वाचा – कर्जात बुडालेल्या बाबाची व्यथा! भरचौकात पोटच्या मुलाची ८ लाख रुपयांना करतोय विक्री
व्हिडिओची सुरुवात मेहता यांच्या स्मार्टफोनवर खलासी गाणे वाजवण्यापासून होते. व्हिडिओ जसजसा पुढे सरकतो तसतसा तो म्हणतो, “या गुजराती गाण्यात हिंदी बोल असते तर?” गाण्यासाठी स्वतःचे संगीत देतो. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून ते ४.१ दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे आणि संख्या अजूनही वाढत आहे. अनेकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी मेहता यांचे कौतूक केले आहे