मराठी भाषा आता सातासमुद्रापार पोहचली आहे. अनेक मराठी भाषिक जगभरात पोहचले आहेत ज्यामुळे परदेशातही मराठी भाषा आपले स्थान निर्माण करत आहे. सोशल मीडियामुळे तर आता मराठी भाषा जगाच्या कानकोपऱ्यापर्यंत पोहचली आहे. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही परदेशातील इन्फ्लुएंसरचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यांना मराठी भाषेची गोडी लागली आहे. या आधी टांझानियाचा सोशल मिडिया स्टार किली पॉली याला तुम्ही मराठी भाषेत संवाद साधताना पाहिले असेल. अनेकदा तुम्ही त्याला मराठी गाण्यांवर नाचताना पाहिले असेल. अशाच एका अफ्रिकन तरुणीलाही मराठी भाषेची गोडी लागली आहे. सोशल मीडियावर एका अफ्रिकन तरुणीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
Kadi Tucker असे परदेशी इइन्फ्लुएंसरचे नाव आहे. ही तरुणी सध्या युएस. लॉस एन्जलिसमध्ये राहत आहे. Kadi हीला मराठी आणि हिंदी भाषा समजते आणि बोलताही येते. ती मराठी आणि हिंदी भाषेत बोलतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. कधी मराठी-हिंदी गाण्यांवर डान्स करत असते. सध्या तिचा सैराट चित्रपटातील एका प्रसिद्ध संवादावर अभिनय करतानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
सैराट चित्रपटातील (आर्ची) आर्चनाची भुमिका प्रचंड गाजली होती. Kadi ने आर्चीसारखे कपडे परिधान केले आहेत. कापडाचा वापर करून आर्चीसारखी वेणी घातली आहे. कपाळावर टिकली लावली आहे. चित्रपटात आर्चीचा एक संवाद खूप गाजला होता. “मला काय करायचे? तू त्याला हात तर लावून दाखव मग मला काय करायचे सांगते की इंग्लिशमधून” आर्चीचा संवाद Kadi ने व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. तिच्या चाहत्याने तिला सैराट चित्रपटातील एखादा संवाद बोलून दाखवण्याची विनंती केली होती. आपल्या चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी Kadi ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करून तिचे कौतूक केले आहे.
हेही वाचा – ‘बाप खरा पाठीराखा!’ लेकाचा अभिनय पाहून वडीलांच्या डोळ्यात आलं पाणी, आनंदाने वाजवल्या टाळया; पाहा Viral Video
एकाने लिहिले, “ही आर्ची भारी आहे बरं का”
दुसऱ्याने लिहिले, अयो, किती भारी आर्ची आहे. इंग्लिशमध्ये सांगितलं तरी भारी वाटेल.
तिसऱ्याने लिहिले, “आयो सेम टू सेम आर्ची दिसते.”
चौथ्याने लिहिले, “एक नंबर ताई, खूप छान जमलं”
Kadiच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मराठी भाषा बोलताना, मराठी गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत जे तिच्या मराठी भाषिक चाहत्यांचे मनोरंजन करणारे आहेत.