सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे फारचं मोहक असतात. भारतीय रेल्वेच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओने नेटीझन्सला मंत्रमुग्ध केले आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघून त्यातल्या दृश्याने मंत्रमुग्ध व्हाल. व्हिडीओसोबत पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “बारामुला-बनिहाल सेक्शनमधील बर्फाच्छादित सदुरा रेल्वे स्थानकात प्रवेश करत असलेल्या बर्फाच्छादित ट्रेनचे मनमोहक दृश्य.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनमोहक व्हिडीओ

व्हिडीओमध्ये स्टेशन बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेले दाखवले आहे. काही वेळातच एक ट्रेन येते आणि ती ट्रेनही पूर्णपणे बर्फाने झाकलेली असते. हा व्हिडीओ अप्रतिम आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल.

नेटीझन्सची प्रतिक्रिया

पोस्ट केल्यापासून हा व्हिडीओ आतापर्यंत जवळ जवळ ५० हजार लोकांनी बघितला आहे. व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, “खूप छान,” दुसऱ्याने लिहिले, “भारताचे स्वित्झर्लंड.”

(हे ही वाचा: सहा सिंहीणीसोबत जंगलात बिनधास्तपणे फिरत होती ही मुलगी, धक्कादायक व्हिडीओ होतोय Viral)

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर बर्फाच्छादित श्रीनगर रेल्वे स्थानकाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, “गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त, हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त”. याचा अर्थ पृथ्वीवर स्वर्ग असेल तर तो इथेच आहे.

(हे ही वाचा: Viral Video: रिक्षा की कार? चालकाचा देसी जुगाड एकदा बघाच!)

(हे ही वाचा: भारत-पाकिस्तान फाळणीनंतर तब्बल ७४ वर्षांनी विभक्त भावांची भेट; भावूक करणारा Video Viral)

रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या तीनपैकी एका फोटोमध्ये श्रीनगर रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या झाडांवर आणि झाडांवर बर्फ दिसतो. तर इतर दोन फोटो त्या ट्रॅकची आहेत, जिथे बर्फ गोठलेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you seen india switzerland video viral enchanting train running on snow covered tracks ttg