श्रीलंकेची गायिका योहानी डिलोका डी सिल्वा हिचं मणिके मागे हितेचे तिचे सादरीकरण युट्युबवर अपलोड करून बरेच महिने झाले आहेत. तथापि, गाण्याभोवती असलेली क्रेझ अजून सुरूच आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते प्रभावशाली व्यक्तींपर्यंत, प्रत्येकजण या गाण्याच्या जादूच्या प्रभावाखाली आहे.

आता, माणिक मागे हिते गाण्यावरच आपलं प्रेम व्यक्त करत पूनम पांडेने व्हिडीओ सादर केला आहे. या अभिनेत्रीने सप्टेंबरमध्ये इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या गाण्यावर स्विंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा जुना व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे.पूनम पांडेला काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातलेला दिसत आहे. ती स्पष्टपणे पेप्पी गाण्याच्या बीट्सचा आनंद घेत आहे.

( हे ही वाचा: Fact-check: मौलाना चक्क अन्नावर थुंकत आहेत? जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओ खरा की खोटा? )

गेल्या काही महिन्यांत, टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षित, जॅकलीन फर्नांडिस, परिणीती चोप्रा आणि इतरांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी स्वत: मणिके मागे हिते गातानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांचे काही व्हिडीओ येथे पहा:

( हे ही वाचा: Video: …अन् पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांसमोरच राष्ट्रपतींची दृष्ट काढली )

पूनम पांडेने २०१३ मध्ये नशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात शिवम पाटील यांचीही भूमिका होती.

Story img Loader