पुणे हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक मानले जाते. पुण्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभेलाला आहे. पुण्याला हे विदयेचे माहेरघर म्हणतात. पण पुण्याची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. पुण्याला सुंदर निसर्गाचा वारसा देखील लाभाल आहे. चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या पुण्यामध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. पुण्यात गाडी काढून कुठेही बाहेर फिरायला जायच म्हणजे अगदी एक ते दोन तासात तुम्ही पुण्यातील कोणत्याही निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊ शकता. पुण्यात अनेक सुंदर टेकड्या आहेत ज्या येथील निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जातात. पुणेकर आणि पुण्यातील सर्व टेकड्यांचे घट्ट नाते आहे कारण बहुतेक पुणेकर रोज सकाळी घराजवळच्या टेकडीला आवर्जून भेट देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील पर्वती टेकडी सर्वांनाच माहित आहे. पुण्यात आल्यानंतर अनेकजण पर्वतीला आवर्जून भेट देतात पण पुण्यातील सर्वात सुंदर टेकडी कोणती असेल तरी ती आहे तळजाई टेकडी. पुणेकरांसाठी तळजाई टेकडी म्हणजे मोकळा श्वास घेण्यासाठी हाकेच्या अंतरावर असलेले ठिकाण. वनविभागाने तळजाई टेकडेवर वन उद्यान विकसित केले आहे त्यामुळे येथे अनेक हिरवीगार झाडी पाहायला मिळतात. तळजाई टेकडीला जाण्याचा रस्तावर दुतर्फा झाडे पाहायला मिळते त्यामुळे येथे फिरण्याची मज्जा काही वेगळीच आहे. तळजाई टेकडीचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आजही मोर पाहायला मिळतात. अगदी पहाटेपासूनच चालण्यासाठी येथे नागरिकांची गर्दी होती. झाडांच्या मधोमध चालण्यासाठी येथे पायवट केलेली आहेत. स्वारगेटपासून तळजाई टेकडी ही फक्त ५ किमी अंतरावर आहे.

तळजाई टेकडीवर तळजाई मातेचे मंदिर देखील आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या तळजाई माता मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे.तळ्यात सापडलेल्या देवीच्या मूर्तीला तळजाई देवी हे नाव देण्यात आले होते.  आज तळजाई टेकडीला भेट देणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहे; पण या मंदिराचा इतिहास फार मोजक्याच लोकांना माहीत आहे.