Mumbai Grandmother Dance Video : “कलेला वयाचे बंधन नसते’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. प्रत्येकाच्या अंगी कोणती ना कोणती कला असते ती प्रत्येकाला जोपासावी लागते. कोणाला सुंदर गाणे गाता येते, कोणाला सुंदर लिहिता येते, तर कोणाला सुंदर नाचता येते. नृत्य ही अशी कला आहे जी प्रत्येक व्यक्तीला आनंद देते. नृत्य करणाऱ्यापासून नृत्य पाहणाऱ्यांपर्यंत सर्वांना ही कला आवडते. गाणे कोणतेही वाजत असो ज्यांचे पाय गाणे ऐकताच थिरकू लागतात तो खरा कलाकार मग त्यांचे वय काहीही असतो. सध्या अशाच एका आजींची व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एका आजींनी चक्क रॅप गाण्यावर नाचत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांचा आजींचा उत्साह फार आवडला आहे. व्हायरल व्हिडिओ डोंबिवलीमधील आहे. फडके रोड येथे Dombivli F4st cypher हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील रॅप गाण्यावर नाचत आहे.
रॅप गाण्यावर आजींचा स्वॅग
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, काही तरुण रॅप गाणे सादर करत आहे. एक मुलगा बीटबॉक्सिंग सादर करत आहे तर रॅप गाणे म्हणत आहे. अनेक तरुण त्यांच्या गाण्याचा आनंद घेत आहे, दरम्यान एक आजीबाई रॅप गाण्यावर थिरकताना दिसत आहे. आजीबाईंचा उत्साह पाहून तिथे उपस्थित सर्वच जण त्यांना प्रोत्साहन देत आहे. आजी आधी हातात पिशवी आणि छत्री घेऊन नाचत होत्या पण पुढच्या क्षणी ते एका मुलाच्या हातात देतात आणि बिनधास्तपणे तरुणाच्या गाण्यावर नाचू लागतात. आजीबाईंच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आजीबाई जमिनीवर बसून नाचत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. आजींच्या रॅप डान्स आणि स्वॅगचचे सर्वांनी कौतुक केले.
येथे पाहा Viral Video
कलेला वयाचे बंधन नसते
इंस्टाग्रामवर whybother_._ नावाच्या पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, यमुनाबाई भगत नावाच्या (@yamunabhagat49) या एक जीवंत उदाहरण आहे की, संगीत आणि कलेला वयाचे बंधन नसते,” हा व्हिडीओ ३१ मार्च रोजी पोस्ट केला आहे आहे. आतापर्यंत ३ लाखंपेक्षा अनेक लोकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.
नेटकऱ्यांनी केले कौतुक
व्हिडीओवर एकाने कमेंट केली की,”आजी म्हणत आहे की, माझी पिशवी पकड , मला नाचू दे.
काहीही बोला, आजीने जे बीट पकडलयं, वाह वा! अशी कमेंट दुसऱ्याने केली.
“हे फक्त डोंबवलीकरच करू शकतात” तिसऱ्याने कमेंट केली.
चौथ्याने मजेशीर कमेंट करत म्हटले की, “आजी आजोबा वाट पाहतायेत, घरी जा पटकन’
आणखी एकाने म्हटले की, “आजी आमच्यापेक्षा कूल आहे.”
l