अनेकदा आपण रस्त्यावर अशी वाहने पाहतो ज्यामध्ये प्रवासी गर्दी करून बसलेले असतात. मग त्यात, शेअर ऑटो, बस, टेम्पो इत्यादी वाहनांचा समावेश होतो. जास्तीत जास्त भाडे मिळावे यासाठी रिक्षा चालक किंवा बस कंडक्टर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आपल्या वाहनांमध्ये बसवतात. गरजेच्या वेळेला लोक कोणत्याही वाहनात बसायला तयार होतात. अनेकदा तर लोक सामानाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्येही बसतात. ज्यामध्ये बसायला सीट तर नसतेच, पण नीट उभं राहायलाही जागा नसते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक टेम्पो दिसत आहे. या टेम्पोमध्ये किमान ३० लोक बसलेले आहेत. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा टेम्पो एका वळणावर जोरात वळतो. यामुळे अपघात होतो आणि टेम्पोचा मागील भाग गाडीपासून वेगळा होऊन रस्यावर पडतो. यातून अनेक लोक बाहेर पडतात.

Viral: प्रियकराला भेटण्यासाठी पोहत केले सीमोल्लंघन! बघा खऱ्या आयुष्यातील ‘अजब प्रेम की गजब कहाणी!’

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास तुम्हाला समजेल की, गाडीचालकाने जुगाड करून डझनभर लोकांना गाडीच्या मागे बसवले होते. रस्त्यावर हा टेम्पो वेगात आला आणि वळला. यानंतर गाडीचा मागील भाग गाडीपासून वेगळा झाला. गाडीत बसलेले सर्व प्रवासी यावेळी रस्त्यावर पडले. व्हिडीओ पाहिल्यावर असे वाटते की एखाद्या धान्याच्या गोणीतून धान्य बाहेर पडले आहे. गाडीमध्ये बसलेले लोक बाहेर पडल्यावर आपल्याला समजते की गाडीमध्ये इतके लोक बसलेले आहेत.

प्रेयसीने ब्रेकअप केल्यानंतर प्रियकराने तिचं अपहरण करुन चेहऱ्यावर गोंदवलं स्वत:चं नाव

या गाडीतून प्रवास करणाऱ्यांपैकी कोणाला दुखापत झाली आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. कारण पडल्यानंतर लगेचच सर्वजण उभे राहून आपले कपडे झडताना दिसत आहेत. या गाडीमध्ये जवळपास ३० लोक प्रवास करत होते असे व्हिडीओमधून दिसून येत आहे. gieddee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you seen the unique way of unloading the passengers from the car watch viral video pvp