इंटरनेटवर अनेकदा प्राणी आणि पक्ष्यांचे गोड व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामुळे लोकांच्या मनाला खूप दिलासा मिळतो. अनेकवेळा हे प्राणी अशी कृत्ये करतात, ज्याला पाहून लोक थक्क होतात. पोपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका महिलेशी हिंदीत बोलत आहे. लाल रंगाच्या पोपटाचा आवाज ऐकून इंटरनेट वापरकर्ते खूप खूश झाले. हा नवीन व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या, कारण पोपट अस्खलित हिंदी बोलत आहे आणि चहाची मागणी करत आहे.
आपल्याला माहितच आहे की पोपट मानवी भाषणाचे अनुकरण करण्यास सक्षम असतात. पोपटाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा सामान्य बोलणारा पोपट नाही, कारण हा पक्षी गोष्टींची पुनरावृत्तीच करत नाही तर घरातील माणसांशी बोलतो. भारतातील अनेक कुटुंबे विदेशी पोपट पाळण्यास प्राधान्य देतात. व्हिडीओमध्ये दिसणारा हा पोपट एक बडबड करणाऱ्या लॉरी ब्रीडचा (Chattering Lory Breed) आहे.
व्हिडीओमध्ये पोपट एका छोट्या खाटेवर बसून आपल्या आवाजात ‘मम्मी’ ओरडताना दिसत आहे. गोंडस पोपट इतर भारतीय मुलांप्रमाणे मम्मी म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. बाई पक्ष्याला मागून ‘येते बाळा’ असे उत्तर देतानाही ऐकू येते. मग पोपट त्याच्याशी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ हिंदीत बोलतो.
गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video
हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा कोणी इतक्या आत्मीयतेने संवाद साधते तेव्हा बोलण्यात एक वेगळीच मजा असते. हे सुंदर आणि निरागस संभाषण ऐकून असे वाटते की कदाचित आपण सर्व प्राणिमात्रांशी असे बोलू शकलो असतो तर…’ हा व्हिडीओ ५६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.