जगात आईस्क्रीमचे कितीतरी विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणानुसार त्याच्या चवीत, त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बदल होत असतो. चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच ही सगळ्यांना आवडणारी आणि कुठेही सहज उपलब्ध होणारी आईस्क्रीम्स आहेत. पण, काही आईस्क्रीम ही खास त्यांच्या भन्नाट चवींसाठी ओळखली जातात. जसे की, पान आईस्क्रीम, गुलाबजाम आईस्क्रीम, तिखट घालून मिळणारे पेरू आईस्क्रीम. पण, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @soyanitasan या हँडलरने चक्क झेंडूच्या फुलांचे आईस्क्रीम बनवले आहे. तिने हे भन्नाट आईस्क्रीम कसे बनवले आहे आणि त्यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहा.
झेंडूच्या फुलांचे आईस्क्रीम
साहित्य
झेंडूची फुले
दूध
व्हॅनिला इसेन्स
हेवी क्रीम
साखर
आईस्क्रीम बनवण्याचे मशीन
हेही वाचा : Video : पाच वर्षांच्या चिमुकलीने ‘सुशी’ खाल्ली आणि… तिने दिलेल्या या निरागस प्रतिक्रियेचा Viral Video पाहिलात का?
कृती
इन्स्टाग्रामवरील @soyanitasan या हँडलरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने सगळ्यात पहिले झेंडूच्या फुलांना स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर सर्व पाकळ्या वेगळ्या करून, एका मिक्सरमध्ये टाकून दूध आणि पाण्यासोबत वाटून घेतल्या आहेत आणि वाटलेले मिश्रण गाळण्याने गाळून घेतले. त्यानंतर त्यामध्ये साखर, दालचिनी किंवा जायफळ याप्रकारची एक पावडर, हेवी क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स घालून घेऊन, मिश्रण ढवळून घेतले. नंतर तिने हे सर्व मिश्रण आईस्क्रीम तयार करणाऱ्या एका मशीनमध्ये घालून तयार केले आहे.
पिवळ्या रंगाचे हे झेंडूच्या फुलांचे आईस्क्रीम दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे. @soyanitasan या इन्स्टाग्राम हँडलरने शेअर केलेल्या या व्हिडीओला आठ मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहू.
झेंडूच्या फुलांच्या आईस्क्रीमवरील प्रतिक्रिया पाहा
ही रेसिपी पाहून एकाने, “वाह, फुलांचा वापर करून आईस्क्रीम बनवण्याची कल्पना एकदमच वेगळी आहे” असे म्हटले आहे, तर दुसऱ्याने “या फुलांवर कीटकनाशकांचा वापर केला नाहीये ना याची खात्री करा”, अशी काळजी व्यक्ती केली. तर तिसऱ्याने, “आम्ही ही फुलं सणासुदीच्या दिवसात सजावटीसाठी वापरतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर चौथ्याने, “झेंडूचं आईस्क्रीम याआधी कुणी खाल्लं आहे का? कारण या फुलांच्या वासावरून तरी याची चव फारशी छान लागणार नाही असं वाटतं”, असे म्हटले आहे.