आज काल लोकांना विचित्र गोष्टी फार आवडतात मग तो एखादा व्हिडीओ असो किंवा खाद्यपदार्थ. अनेकदा सोशल मीडियावर विचित्र खाद्यपदार्थांचे विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोकांना सतत काहीतरी नवीन असते त्यामुळे नवीन एखादा पदार्थ तयार करण्याऐवजी सोत आजकाल खाद्यपदार्थांवर प्रयोग करतात. कधी फँटा मॅगी तयार केली जाते तर कधी चॉकलेट आईस्क्रिम समोसा तयार केला जातो. कधी मँगो पिझ्झा तर कधी बनाना पिझ्झा तयार केला जातो. विचित्र गोष्ट म्हणजे अनेक लोक हे चवीने खाताना दिसतात. सोशल मीडियावर अशा विचित्र खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अशाच एका खाद्यपदार्थाचा पुण्यातील व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.
आता खाद्यपदार्थांवर प्रयोग करून नवीन काहीतरी बनवण्याचे वेड नेटकऱ्यांना देखील लागले आहे. सध्या पुण्यातील एका भेळचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. भेळ ही आपल्यापैकी अनेकांचा आवडता पदार्थ आहे. पण आता आपल्या आवडत्या भेळवरही विचित्र प्रयोग केला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क चॉकलेट भेळ तयार करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, चॉकलेट भेळ तयार करणारी व्यक्ती प्रथम एका भांड्यात लाह्याा घेते, त्यात चॉकोफ्लेक्स टाकते. त्यानंतर त्यावर चॉकलेट सॉस टाकून एकत्र करते. त्यानंतर एका प्लेटमध्ये ही भेळ काढून त्यावर सजावटीसाठी रंगीबेरंगी पदार्थ टाकला जातो. व्हिडीओमध्ये एक तरुणी भेळ खाऊन ती चवीला चांगली असल्याचे सांगत आहे. पिंपरी चिंचवड येथील एका भेळ विक्रेता ही भेळ विक असल्याचे सांगितले आहे.
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर pcmcexplorer नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खाल्ली का आकुर्डीतील फेमस चॉकलेट भेळ” त्याखाली भेळच्या दुकानाचा पत्ता दिला आहे.
व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्ही ही भेळ खाऊ शकता?