Viral Video : तुळशीच्या लग्नानंतर आता लग्नसमारंभ जोरदार सुरू आहे. सोशल मीडियावर सुद्धा लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नात वरमाला घालताना असो की नवरी नवरदेवाचे उखाणे असो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव चक्क भर मंडपात नवरीच्या पाया पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या नवरदेव तरुणाला पाहून कोणीही म्हणेल की नशीब लागतं असा नवरा भेटायला. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.
भारतीय विवाह संस्कृतीत नवरी मुलगी मुलाच्या पाया पडते पण तुम्ही कधी नवरेदवाला नवरीच्या पाया पडताना पाहिले आहे का? मग हा व्हिडीओ नक्की पाहा. हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. नवरदेव नवरी एकमेकांना वरमाला घालताना या व्हिडीओत दिसतात. सुरुवातीला नवरी नवरदेवाला वरमाला घालताना दिसते तेव्हा नवरदेव चक्क गुडघ्यावर बसतो आणि त्यानंतर नवरी वरमाला घालते. नवरीने वरमाला घातल्यानंतर नवरदेव तिच्या पाया पडतो आणि जागेवर उभा होतो. त्यानंतर नवरदेव नवरीच्या गळ्यात वरमाला घालतो. वरमाला घातल्यानंतर नवरीसुद्धा नवरदेवाच्या पाया पडते. या व्हिडीओमध्ये नवरदेव बायकोला लक्ष्मी समजून तिच्या पाया पडताना दिसून येतो. लक्ष्मी नारायणाचा हा जोडा पाहून तुम्हीही भारावून जाल. हा व्हिडीओ पाहून नवरा असावा तर असा, असे तुम्हालाही वाटू शकते.
हेही वाचा : पुढच्या वेळी स्टेशनवर थुंकण्यापूर्वी विचार करा, घाण स्वच्छ करताना सफाई कामगारांचा व्हिडीओ व्हायरल
dmarathi_weddingz या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नशीब लागतं असा नवरा भेटायला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बायकोला लक्ष्मी मानणारे तर खूप भेटतील हो पण नवऱ्याला नारायण मानणाऱ्या मुली खूपच कमी आहेत.कटू सत्य” तर एका युजरने लिहिलेय, “खूप भारी.. खूप छान जोडी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “शिव पार्वती” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.