निसर्गाच्या सानिध्यात बसून पक्षी, आजूबाजूचे प्राणी बघत जेवणाचा आस्वाद घेत असताना अचानक एक नको असलेला पाहुणा तुमच्यात आला तर…? असेच काहीसे झाले आहे मेलबर्न येथील एका कुटुंबासोबत..हे कुटुंब तलावाच्या काठी बसून दुपारचे जेवण घेत होते.  आकाशात उडणारा ससाणाही त्यांचे  मनोरंजन करत होता. ससाण्याची भरारी बघण्यात आणि त्याचे व्हिडिओ काढण्यात हे कुटुंब रमून गेले होते. प्रत्येकजण एक एक प्रसंग कॅमेरात टिपण्यासाठी धडपड होते आणि अचानक ससाणा असे काही करतो ज्याने सगळेच घाबरून जातात.  तलावाच्या किनारी घिरट्या घालत असलेला हा ससाणा अचानक जीवंत सापाला आपल्या पंज्यात पकडतो आणि मोबाईलमध्ये चित्रिकरणात व्यस्त असलेल्या कुटुंबियांच्या जेवणाच्या टेबलावरच तो जिंवत साप सोडतो. आता अगदी अनपेक्षितरित्या आलेल्या जीवंत सापाला पाहून या सगळ्यांचीच कशी तारांबळ उडते यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. युट्युबवर एडब्ल्यू चॅनेलने हा व्हिडिओ अपलोड केला असून याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.