तुम्ही बस, ट्रेनमध्ये फेरीवाल्यांना खाद्य पदार्थ विकाताना बघितले असेल. ग्राहकांनी आपल्याकडील वस्तू घेण्यासाठी ते अनोख्या ट्रिक्स वापरतात. आवाजामध्ये बदल करतात. विनोद करतात. याने ग्राहकांचे मनोरंजनही होते, तसेच विक्रीच्या या पद्धतीने फेरीवाल्यांनाही फायदा होतो. असाच मनोरंजक पद्धतीने वस्तू विकत असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, बस, ट्रेन नव्हे तर हा व्यक्ती चक्क प्लेनमध्ये वस्तू विकताना व्हिडिओत दिसून येत आहे.
bjbala_kpy नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत एका प्लेनमध्ये एक तरुण प्लेनमध्ये फळ विकतना दिसत आहे. त्याची विकण्याची पद्धत मजेदार आहे. त्याचा आवाज ऐकून बसमध्ये विक्री करणाऱ्या फेरीवाल्याचे चित्र तुमच्या डोळ्यापुढे येईल.
प्रवाशांना पोट धरून हसवले
तरुण प्लेनमधील प्रवाशांना त्याच्याकडील वस्तू विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा आवाज आणि चेहऱ्यावरील भाव प्रवशांना पोट धरून हसवत आहे. हे दृश्य पाहून विमानामध्ये कधीपासून फेरिवाल्यांना प्रवेश मिळाला हा प्रश्न तुम्हाला पडेल. मात्र हा कोणी फेरीवाला नसून विमानामधील एक प्रवाशी आहे. तो आपल्या कुटुंबासोबत या प्लेनमध्ये प्रवास करत होता. कुटुंबाला हसवण्यासाठी, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी त्याने हे भन्नाट कृत्य केले.
तरुणाने हुबेहुब फेरीवाल्याची नक्कल केली. प्लेनमध्ये त्याला वस्तू विकताना पाहून प्रवाशांमध्ये चांगलाच हशा पिकला. या व्हिडिओला जवळपास ४ लाख लोकांनी लाईक केले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजरने या तरुणाच्या अफलातून नक्कलीचे कौतुक केले आहे.