“तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“तुम्ही हा चॅनल पॅक सब्स्क्राईब केलात तर पहिले २ महिने फ्री नंतर ४०० रूपयांचा चार्ज”

“आम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर फ्री इन्शुरन्स देत आहोत”

हे असल्या प्रकारचे अनेक फोन किंवा ई-मेल्स आपल्याला येत असतात. या गोड वाटणाऱ्या आॅफर्स आपण स्वीकारल्या की आपल्या एक क्लिकद्वारे आपण या योजनेत सहभागी होतो. अगदी छान प्रकारे लिहिलेल्या या मेल्समध्ये छुपे खर्च मोठ्या खुबीने बारीक अक्षरात लिहिलेले असतात. तेसुध्दा सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी ते या ई-मेलमध्ये लिहिलेले असतात.

बंगळुरूमधल्या एका माणसाने एचडीएफसी बँकेला या अशा बाबतीत माफी मागायला लावली. कार्तिक श्रीनिवासन् यांनी यासाठी एक अभिनव मार्ग वापरला. हा मार्ग म्हणजे ट्विटर सत्याग्रहाचा. त्यांनी ५० दिवस सतत एचडीएफसी बँकेला ट्वीट करत त्यांना माफी मागायचं आवाहन केलं. आणि त्यांच्या ट्वीट्सच्या या भडिमारामुळे बँकेला शेवटी नमावंच लागलं.

एचडीएफसी बँकेने आपवल्या ग्राहकांना एक ई-मेल पाठवून त्यांना एक ‘पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर’ सर्व्हिस देऊ केली होती. यामध्ये त्या ग्राहकाला त्याच्या बँकिंग व्यवहारांची काळजी घ्यायला एक खास प्रतिनिधी मिळणार होता. अतिशय छान छान शब्दांमध्ये लिहिलेल्या या मेलच्या मुख्य मजकुरात या सर्व्हिससाठी लागणाऱ्या सर्व्हिस चार्जेसचा उल्लेख नव्हता. हे चार्जेस्  या ई- मेलच्या एका कोपऱ्यात बारीक अक्षरांमध्ये लिहिलेले होते.

यापुढेही जात या बँकेने ही ई-मेल मिळालेल्या ग्राहकांना ‘बाय डीफाॅल्ट’ या सर्व्हिसमध्ये सामील करून घेतलं होतं. आणि जर ही सर्व्हिस नको असेल तर एका आॅप्शनवर क्लिक करायचं होतं. ही लिंक अर्थातच बारीक अक्षरात होती.

VIDEO: टॅलेंटचा उंचावरून पडणारा धबधबा बाबा सेहगल

ही ग्राहकांची फसवणूक आहे असं म्हणत श्रीनिवासन् यांनी बँकेला संपर्क साधूनसुध्दा जेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही तेव्हा त्यांनी याबाबतीत एचडीएफसी बँकेला सलग एक वर्ष ट्वीट करत त्यांच्याकडून माफीची मागणी करायचा निश्चय केला. यानुसार त्यांनी ट्वीट करायला सुरूवातही केली. सलग ५० दिवस चिकाटीने ट्वीट केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश येत बँकेने ग्राहकांची माफी मागितली.

अनेक वेळा कंपन्यांकडून आपली लूट होत असल्याचं लक्षात आल्यावरही आपण ‘कशाला कटकटी’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. आपला खिसा कापून लुटले जाणारे पैसे परत मिळवण्यासाठी बाबूगिरीचा सामना करावा लागेल या भीतीने आपण अनेकदा त्यावर काही उपाययोजना करत नाही. पण कार्तिक श्रीनिवासन् ने वापरलेल्या या ‘ट्विटर सत्याग्रहासारख्या’ अनेक अनोखे मार्ग उपलब्ध असतात. हे वापरले की आपल्याला आपला हक्क बजावता येतोच पण ग्राहकांना गृहित धरत त्यांच्या जिवावर नफा मिळवू पाहणाऱ्या काॅर्पोरेट कंपन्यांनाही चांगलाच दणका मिळतो.