“कोशिश करने वालों की कभी हार नही होती” हा डायलॉग आपण अनेकवेळा ऐकला असेल. अनेक प्रेरणादायी व्हिडीओमध्ये या डायलॉगचा हमखास वापर केला जातो. या डायलॉगची आता आठवण होण्याचं कारण म्हणजे, सध्या सोशल मीडियावर एका तरुणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या चर्चेचं कारण म्हणजे, त्याने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत अभ्यास केला आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे. झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुण तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. याबाबतची माहिती झोमॅटोने स्वतः ट्विट करून दिली आहे. शिवाय त्यांनी आपल्या या कर्मचाऱ्याच्या यशाचे कौतुकदेखील केले आहे. अनेक नेटकरी या तरुणाच्या जिद्दीचं आणि त्याने मिळवलेल्या यशाचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारी अधिकारी बनलेल्या या तरुणाचे नाव विघ्नेश असं आहे. विघ्नेश Zomato कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना तो तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या परीक्षेचा निकाल १२ जुलै रोजी जाहीर झाला होता. आता Zomato ने आपल्या कर्मचाऱ्याच्या यशाची दखल घेत त्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

हेही पाहा- सापानेच केली सापाची शिकार! चक्क कोब्राने अजगराला गिळल्याचा Video पाहून डोकंच धराल

या फोटोमध्ये विघ्नेश त्याच्या कुटुंबीयांसह स्टेजवर उभा असल्याचं दिसत आहे. झोमॅटोने या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी टाकत लिहिलं आहे, “विघ्नेशसाठी एक लाइक, ज्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असताना तमिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला.” सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने “व्वा, विघ्नेशचे अभिनंदन.” असं लिहिलं आहे. तर दुसऱ्याने, कष्ट आणि इच्छा असेल तर माणूस काहीही करु शकतो, असं लिहिलं आहे. तर तिसऱ्याने, “विघ्नेशच्या जिद्दीला सलाम.” असं लिहिलं आहे. त्यामुळे सर्वच नेटकरी विघ्नेशचं मनापासून अभिनंदन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

तामिळनाडू लोकसेवा आयोग –

तामिळनाडू लोकसेवा आयोग परीक्षा ही TNPSC द्वारे आयोजित राज्यस्तरीय नागरी सेवा परीक्षा आहे. TNPSC ने १२ जुलै रोजी एकत्रित नागरी सेवा परीक्षा गट ४ चा निकाल जाहीर केला होता. ही परीक्षा ग्राम प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, बिल कलेक्टर ग्रेड-१, बिल कलेक्टर, फील्ड असिस्टंट आणि स्टोअर कीपर यांसारख्या विविध पदे भरण्यासाठी घेतली जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He became a government official while working as a delivery boy zomatos special tweet to appreciate photo viral on social media jap
Show comments