Puneri pati viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे.आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. परंतू, एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी एक अट घालून पाटी लावली आहे. ती वाचून लोकांनीदेखील उधारी मागणे बंद केले आहेत. उधार मागणाऱ्या ग्राहकांच्या जाचाला कंटाळून ही पाटी लावली आहे. या पाटीमुळे पुणेकरांच्या सर्जनशीलतेचं आणि हटके पाट्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालयं.

दुकानात अशी पाटी लागली आहे. याद्वारे दुकानदाराने उधारीपासून मुक्ती मिळविली आहे. त्याने वैतागून उधारी बंद केली होती. परंतू त्याचे ग्राहक सारखे त्याच्यामागे उधारी मागत होते. यामुळे हा दुकानदार आणखी त्रस्त झाला होता. यामुळे दुकानदाराने उधारी पुन्हा सुरु करण्यासाठी अट टाकली आहे. ही अट शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे. लोकांना उधारी मागणे सुरुच ठेवले होते. प्रत्येकाला नाही नाही सांगून वैतागल्याने शेवटी असे पोस्टर लावले आहे.

Rahul Gandhi talk to Anna Sebastian Perayil parents
Rahul Gandhi to Anna’s parents: ‘आमची मुलगी गुलामासारखं काम करत होती’, ॲनाच्या पालकांनी राहुल गांधीसमोर मांडली खंत
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
CID , MIDC, Konkan, Bal mane, Uday Samant,
कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
News About Dhaba
Dhaba Name : ‘मुस्लीम’ मालकानं ढाब्याचं ‘हिंदू’ नाव धमक्यांमुळे बदललं, नेमकी घटना काय?
Uttar Pradesh Kushinagar
Uttar Pradesh Kushinagar : मन सुन्न करणारी घटना! हॉस्पिटलचं ४ हजारांचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने वडिलांनी तीन वर्षांच्या मुलाला विकलं

आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावरील एका विक्रेत्याने उधारी बंद करण्यासाठी अजब मार्ग शोधला आहे. एका रस्त्यावरील विक्रेत्याने त्याच्या स्टॉलवर लावलेला बोर्ड सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, “उधार फक्त १०० ते १५० वर्ष वयाच्या लोकांनाच दिले जाईल, ते पण त्यांच्या आई-वडिलांना विचारुन” असा बोर्ड या विक्रेत्यानं लिहला आहे. ही अट शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड होताच हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> पावसाळा सुरु झाला की कोकणातील ‘या’ VIDEO ची आठवण येतेच; मंडळी पाहून पोट धरुन हसाल

लोकांच्या प्रतिक्रिया पहा

@aaamhipunekar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ७२ लोकांनी लाइकही केला आहे. यावर अनेक यूजर्स आपापल्या प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…कोणताही मूर्खपणा करू नका. आणखी एका युजरने लिहिले..भाऊ, मी तुमच्याकडून पुन्हा उधारी घेऊ शकणार नाही. तर दुसऱ्या युजरने लिहिले… भाऊ १ महहिन्यानंतर हा बोर्ड काढा.