सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नक्कीच तुमचे मन जिंकेल. या व्हिडीओमध्ये एक तरुण कडाक्याच्या थंडीमध्ये एका कुत्र्याला वाचवण्यासाठी बर्फाळ नदीमध्ये उडी मारतो. यादरम्यान त्या व्यक्तीने जीवाची पर्वा न करता प्रचंड थंडीत कपडे काढून बर्फाळ पाण्यात उडी घेतली. यानंतर तो त्याला कुत्र्याचे प्राण वाचवून त्याला नदीबाहेर घेऊन येतो.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ व्हायरल हॉग (Viral Hog) या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ थक्क करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक बर्फाळ प्रदेश दिसून येत आहे. तसेच काही लोक बर्फाळ नदीकडे पाहत आहेत. तेव्हाच एक तरुण आपले कपडे काढून येतो आणि या बर्फाने गोठलेल्या नदीमध्ये उडी मारतो. बऱ्याच वेळ आपल्याला समजत देखील नाही की या तरुणाने नदीमध्ये उडी का घेतली.
रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे
हा तरुण नदीमध्ये उडी घेतो तेव्हा पृष्ठभागावरील गोठलेला बर्फ तुटतो. त्यानंतर तो जसजसा पाण्यात पुढे जातो तसतसा गोठलेला बर्फ तुटतो. काही वेळाने हा तरुण झुडपांमधून जसा पुढे जातो तसा आपल्याला तिथे एक काळ्या रंगाचा कुत्रा पाण्यात अडकलेला दिसतो. या कुत्र्याला पाण्यातून बाहेर पडायला जमत नाही. तो मदतीसाठी ओरडत आहे. व्हिडिओतील कुत्र्याची अवस्था पाहून तुम्हालाही दया येईल.
दरम्यान, बर्फाळ पाण्यातून ती व्यक्ती कुत्र्यापर्यंत पोहोचते आणि कुत्र्याला परत आणते. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते या तरुणाचे जोरदार कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. प्रत्येकजण त्या व्यक्तीला हिरो म्हणत आहे.