Optical illusion: दिसतं तसं नसतं म्हणूच जग फसतं! ही म्हण तुम्ही ऐकली असेल. या म्हणीची प्रचिती देणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बसमध्ये एका सीटवर एक व्यक्ती बसलेली दिसत आहे ज्याचं डोक गायब झालं आहे. फोटो पाहिल्यानंतर या व्यक्तीला डोकं नाही असे वाटते आहे. हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? चला जाणून घेऊ या फोटोची गंमत.
तुम्ही ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे काय हे ऐकले असेल. सध्या कित्येक ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही एखाद्या फोटो किंवा व्हिडीओ पहिल्यांदा पाहता तेव्हा त्यात नक्की काय आहे हे तुम्हाला समजत नाही. यालाच दृष्टीभ्रम किंवा ऑप्टिकल म्हणतात. ऑप्टिकल इल्यूजन असलेले हे फोटो तुम्हाला अशा गोष्टी दाखवते जे प्रत्यक्षात असित्वात नसतात. हा फक्त तुमच्या डोळ्यांना होणारा एक भास असतो. लोकांना असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो फार आवडतात कारण त्यामध्ये दडलेल्या गोष्टी शोधण्याची वेगळीच मज्जा असते. ऑप्टिकल इल्यूजन हे प्रत्यक्षात तुमच्या कल्पना आणि तुमच्या आकलन क्षमतेला हे चालना देत असते. हा फोटो देखील असाच आहे.
फोटोतील व्यक्तीचं डोक झालं गायब?
सध्या व्हायरल होत असलेला फोटो एक ऑप्टिकल इल्यूजन आहे. हा Reddit वर फोटो शेअर करताना यूजरने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ”फक्त एक मुलगा हूडी घालून बसला आहे.” फोटोमध्ये एका व्यक्ती सार्वजनिक बसमध्ये बसलेली दिसत आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्ही बसमध्ये बसलेला हा व्यक्ती जॅकेटमध्ये हात टाकून खिडकीमध्ये सरळ बसला आहे असे दिसेल. पण त्या व्यक्तीला डोकं नाही असा तुम्हाला वाटेल. फोटो पाहून तुम्हाला भिती वाटू शकते पण, असे वाटणारे तुम्ही एकटेच नाही. हा फोटो पाहणाऱ्या प्रत्येकाला हाच भास होतो की, हा एक डोक नसलेला माणूस आहे. तुम्हाला असेही वाटू शकते की त्याचे डोकं एडीट केलेले आहे पण प्रत्यक्षात असे काही नाही.
हेही वाचा – शोधाल तर सापडेल! ‘या’ फोटोत लपलंय एक लबाड मांजर, समोर असूनही दिसणार नाही, १० सेंकदाचं चॅलेज घ्या
तुम्हाला दिसतेय का व्यक्तीचं डोकं?
फोटोतील व्यक्तीला डोकं आहे फक्त ते तुम्हाला दिसत नाही. फोटोमध्ये तुम्हाला जॅकेटची कॉलर दिसते आहे ते त्या व्यक्तीचे डोकं आहे. तुम्हाला जे कॉलर वाटतेय ते जॅकेटचे हुडी आहे जे त्या व्यक्तीने डोक्यात घातलं आहे आणि तो खिडकीच्या काचेवर डोकं टेकवून झोपला आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. हीच तर या फोटोची गंमत आहे.
हेही वाचा – चौथी मांजर कुठे आहे? तुम्ही खरचं Cat Lover असाल तर ५ सेंकदात सांगा उत्तर
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
अनेक युजर्सने हे ऑप्टिकल इल्यूजन जे कोडं सोडवलं आणि या व्यक्तीचं डोकं शोधलं आणि काहींना मात्र हे कोडं सोडवता आलं नाही.
एका Reddit वापरकर्त्याने पोस्ट केले, “अरे हे त्याचे डोके बाजूला पडलेले आहे, ती कॉलर नाही. मला थोडा वेळ लागला, हे छान आहे!”
दुसर्याने स्पष्ट केले, “मलाही ते पाहण्यात खूप त्रास झाला. कॉलरसारखी दिसणारी ती पट्टी तुम्हाला दिसते का? ती प्रत्यक्षात त्याच्या हुडची डावी बाजू आहे. त्याचे डोके उजवीकडे झुकलेले आहे आणि तिच्या डोक्याचा वरचा भाग काचेच्या दिशेने आहे, त्यामुळे तुम्हाला तेथून फक्त हुडची डावी बाजू दिसते.”
तिसऱ्याने लिहिले, “मला फक्त डोके नसलेला माणूस दिसतो. हे काय आहे?”
चौथ्याने गंमत केली. “आधी मला वाटलं की मी आरशात त्याचं डोकं पाहतोय, पण नाही. मला समजले की त्याचं डोकं हुडीमध्ये आहे आणि खूप मागे झुकलं आहे. एवढा त्याच्या डोक्याचा भाग जॅकेटच्या कॉलरसारखा दिसतो.”
काही वर्षांपूर्वी ही पोस्ट शेअर केली आहे. आता ती पुन्हा व्हायरल झाली आहे. आत्तापर्यंत त्याला सुमारे ५९ हजार अपव्होट्स मिळाले आहेत आणि ही संख्या अजूनही वाढत आहे.
ऑप्टिकल इल्युजनबद्दल तुमचे काय मत आहे?