कांद्याशिवाय जेवणाला चव ती काय? म्हणूनच नाही का कांद्याचे भाव वाढले की सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येते. पण फक्त चवीसाठी कांदा उपयोगी ठरतो असे नाही. कांद्याचे अनेक फायदे आहेत. सर्दी, घशातील खवखव दूर करण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर आहे. तसेच केस गळण्याच्या समस्येवरही कांदा गुणाकारी आहे. याव्यतिरिक्तही कांद्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. पण या कांद्याचा आणखी एक फायदा आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे. तो म्हणजे असा की हवा शुद्ध करण्यासाठी आणि हवेतील बॅक्टेरिया मारण्याचे कामही कांदा करतो म्हणूच आजही अनेक घराच्या कोप-यात सोललेला कांदा किंवा कांद्याच्या चकत्या कापून ठेवल्या जातात.
वाचा : उशाखाली लसूण ठेवल्यावर असाही फरक पडतो
वाचा : जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे
वाचा : रात्री ‘हे’ पदार्थ खाणे आवर्जुन टाळा
तापाची साथ असते तेव्हा अनेक घरांच्या कोप-यात सोललेला कांदा ठेवला जातो. कांदा हवेतील अशुद्धी दूर करतो. घरातील हवा स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे हवेत बॅक्टेरीया पसरण्यास देखील कांदा रोखतो. अनेक जण साथीच्या रोगाच्यावेळी घराच्या कोप-यात सोललेला कांदा ठेवतात त्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडत नाही. कारण अनेक आजार हे हवेतून पसरतात. हे कांदे दर तीन महिन्यांनी बदलायचे असतात. सर्दी, खोकला, कफ, तापाची साथ असेल तर एका वाडग्यात सोललेला पांढरा कांदा मधोमध कापून ठेवला जातो.