आजकाल प्रत्येकाचे जीवन खूप व्यस्त झाले आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यस्त आहेत. काम आणि जवाबदारी या दोन्ही गोष्टींमुळे तणाव प्रत्येकाचा जीवनात अगदीच सामान्य झाला आहे. तसेच या सगळ्यामुळे नकळत आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण, प्रत्येकाने दिवसाच्या वेळापत्रकातून थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आयएएस अधिकारी यांनी कोणत्या गोष्टींच्या मदतीने आपले जीवन अधिक सोपे आणि आनंदी होईल याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.
आयएएस अधिकारी सुहास (IAS Suhas LY) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत ; ज्याच्या मदतीने आपले जीवन अधिक सोपे आणि आनंदी होऊ शकते. काय आहेत या खास टिप्स पाहू…
१. सगळ्यात पहिला त्यांनी व्हिडीओत सांगितले की, दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी एक तास तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे.
२. दुसरं म्हणजे साकारात्म विचार. आपण प्रत्येक गोष्टींचा चांगल्या बाजूने विचार केला पाहिजे.
३. प्रत्येकाने तेल, साखरेचं सेवन थोडं कमी केलं पाहिजे.
४. मोबाईलचा वापर कमी करा आदी काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी व्हिडीओ द्वारे सांगितल्या आहेत.
पोस्ट नक्की बघा :
तसेच तुम्हाला या सगळ्यांमध्ये कोणत्या गोष्टी योग्य वाटत आहेत त्यांचा तुमच्या जीवनात नक्की उपयोग करून बघा असे देखील आयएएस अधिकारी यांनी आवर्जून सांगितले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @suhas_ly यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आयएएस अधिकारी सुहास एलव्हाय एक भारतीय बॅडमिंटनपटू आणि आयएएस अधिकारी आहेत.