देशात गेल्या दोन वर्षात करोना संकटामुळे लोकं हवालदिल झाले आहेत. करोनाच्या दोन लाटेनंतर आता ओमायक्रॉनची तिसरी लाट आहे. करोना विषाणू रोखण्यासाठी लस हे प्रभावी हत्यार आहे. त्यामुळे सरकारने फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. असं असलं देशात अजूनही काही लोकं करोना लसीचा पहिला डोसही घेत नाही. आरोग्य कर्मचारी लोकांच्या घरी जाऊन त्यांना लस देत आहेत. मात्र असं असलं तरी काही जणांकडून त्यांना विरोध सहन करावा लागत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वैद्यकीय पथक एका व्यक्तीला लस देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र ती व्यक्ती लस घेण्यास घाबरत आहे. पथकातील कर्मचारी त्या व्यक्तीला सांगतात, लस घ्यायची आहे, प्रतिसादात ती व्यक्ती नाही घेणार असं सांगत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरत नाही. लोकं वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत आहेत. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे – ही खरोखर हसण्यासारखी बाब आहे. त्याचवेळी, आणखी दुसऱ्या यूजरने म्हटले आहे की, लस घ्या.
दुसरीकडे, देशात करोना प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या काही दिवसांमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत चाचण्यांमध्ये घट झाल्याची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे़ चाचण्यांवर भर देऊन बाधितांवर वेळेत उपचाराद्वारे करोनाप्रसार रोखा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना केली आहे़. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे़ ‘‘करोनाचा उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत़ ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने २७ डिसेंबर रोजी करोना नियंत्रणाबाबत सुधारित सूचना दिल्या होत्या़ त्यात करोना चाचण्या हा महत्त्वाचा घटक आहे़ मात्र, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोना चाचण्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे’’, याकडे आहुजा यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे़