Viral video: हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान उत्तर प्रदेशातून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एका बँक कर्मचाऱ्याचा बँकेत काम करताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

हसत-खेळत काम करतानाच काळाचा घाला

Brave Woman Fights Off Around 15 Stray Dogs With Slipper In Hyderabad shocking video
VIDEO : भयंकर! जमिनीवर पाडले, लचके तोडले; ती किंचाळत राहिली अन्…मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
The young man showed cleverness to escape from the stray dogs
याला म्हणतात डोकं! भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तरुणानं लढवली शक्कल; VIDEO पाहून पोट धरून हसाल

कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हल्ली अनेकांना कोणत्या परिस्थितीत कधी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येईल ते सांगता येत नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जीव गेला, अशी परिस्थिती उदभवल्याचे दिसते. एका ३० वर्षीय बँक कर्मचाऱ्याला त्याच्या कार्यालयात हृदयविकाराचा झटका आल्याच्या व्हिडीओने भारतीय तरुणाईची वाढत्या हृदयविकारग्रस्तांच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता वाढवली आहे. उत्तर प्रदेशातील महोबा येथील एचडीएफसी शाखेतील कृषी महाव्यवस्थापक राजेश कुमार शिंदे यांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बँकेत लॅपटॉपवर काम करताना अचानक राजेश कुमार यांनी खुर्चीवरच अंग सोडून दिले. यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या सहकाऱ्याच्याही गोष्ट लक्षात आली आणि त्यानं इतरांना सावध केले. तेव्हा सगळ्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न करीत डेस्कवरून मोकळ्या जागेत हलवले. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि त्यांना बरे वाटावे म्हणून त्यांना CPR देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रकृती अधिक बिघडली असल्याचे लक्षात आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; पण तोपर्यंत उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?

या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, @SachinGuptaUP नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करीत आहेत. एका युजरने पुढे लिहिले की, सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी जिवंत घरी परत येईल, असा दावा कोणीही करू शकत नाही

सीपीआर म्हणजे काय?

हृदयविकाराचा झटका आल्यावर सीपीआर देतात म्हणजे नेमके काय? तर सीपीआरचा अर्थ कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. एखादी व्यक्ती आजारी पडली, तिची शुद्ध हरपली, ती श्वासोच्छवास करीत नाहीये किंवा श्वास मंदावला आहे, अशी कोणाचीही स्थिती उदभवल्यास सीपीआर दिला गेला पाहिजे. या उपचार प्रक्रियेद्वारे त्या व्यक्तीच्या फुप्फुसाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. छातीवर दाब देणे आणि तोंडाद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.