Viral video: कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. अभिनेता श्रेयस तळपदेलाही काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान अशीच एक घटना सध्या समोर आली आहे, यामध्ये रस्त्यावरुन सहज चालता चालता २२ वर्षाच्या तरुणाला हृदयविकाराच्या झटका आला..पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माणसाचा मृत्यू अटळ आहे पण तो असा अचानक आला, तर आयुष्याच्या सोनेरी वाट मृत्यूच्या दारात जाऊन संपते. जगात अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडतात. आपल्या समोरच भयानक घटना घडतात, असं नाही. परंतु, थरकाप उडवणाऱ्या काही घटना घडतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येतात. अशाच एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. कारण चालता बोलता एका तरुणाला मृत्यू आल्याची घटना घडल्याचा थरार एका कॅमेरात कैद झाला आहे.
दुकानातून किराणा घेऊन जात असताना एका २२ वर्षीय युवकाला हार्ट अटॅक आला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलीय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरुन तरुण चालत आहे, त्याच्या हातात सामानाची पिशवी आहे. यावेळी तो अचानक जमीनीवर कोसळतो आणि त्याच्या डोक्यालाही लागतं. आजूबाजूला असलेल्या लोकांनाही तरुणाला नक्की काय झालंय हे लक्षात येत नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “काळजाचा तुकडा दिला हेच खूप” म्हणत सासऱ्यांनी दिलेली कार जावयानं नाकारली; VIDEO होतोय व्हायरल
या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून @SachinGuptaUP नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. एका युजरने पुढे लिहिले की, सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी जिवंत घरी परत येईल असा दावा कोणीही करू शकत नाही. हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.