Viral video: माणसाचा मृत्यू अटळ आहे पण तो असा अचानक आला, तर आयुष्याच्या सोनेरी वाट मृत्यूच्या दारात जाऊन संपते. जगात अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडतात. आपल्या समोरच भयानक घटना घडतात, असं नाही. परंतु, थरकाप उडवणाऱ्या काही घटना घडतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येतात. तो हॉटेलमध्ये घरच्यांसोबत जेवायला गेला, सगळे हसत-खेळत गप्पा मारत होते. मात्र तेवढ्यात असं काही घडलं ज्याने आनंदाचं वातावरण क्षणात बदललं आणि जीवघेणी शांतता पसरली. मध्य प्रदेशात गप्पा मारत बसलेल्या एका व्यक्तीला अचानक मृत्यूनं गाठल्याची घटना घडल्याचा थरार एका कॅमेरात कैद झाला आहे.
हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हृदयविकाराशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.जीममध्ये व्यायाम करताना, मैदानात खेळताना, डान्स करतना हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण बसल्या जागी असं मृत्यूनं गाठलेलं पहिल्यांदाच पाहिलं असेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यात एक व्यक्ती त्याच्या कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये बसलेला असताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो. यावेळी हॉटेमधला वेटर यतो टेबलवर सगळ्यांना जेवन वाढतो. यावेळी हा व्यक्ती मोबाईलमध्ये काहीतरी बघताना दिसत आहे. सगळं व्यवस्थित सुरु असतं. दरम्यान अचानक त्या व्यक्तीला त्रास व्हायला सुरुवात होते आणि काही कळायच्या आतच तो व्यक्ती समोरच्या टेबलवर आपलं डोकं टेकवतो. यावेळी बाजूला पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती त्यांना सावरायचा प्रयत्न करतो मात्र ते खाली कोसळतात. व्हायरल व्हिडिओ @mukeshb22315350 या अकाउंटवरुन एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचे समजत आहे .
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> सोंडेत धरली गाडी आणि…; चवताळलेल्या हत्तीचा पर्यटकांवर खतरनाक हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO
कैलाश पटेल असं मृताचं नाव आहे. कैलाश पटेल त्यांच्या कुटुंबासोबत जेवायला गेले होते. तेव्हा हॉटेलमध्ये त्यांना सायलेंट अटॅक आला. कोणाला काही कळायच्या आधीच त्यांचा जीव गेला होता.