Viral video:पूर्वी इंटरनेट नव्हते तेव्हा लोक काय करायचे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की बघा. सिंहाला दूरून पाहिलं तरी भल्याभल्यांची भंभेरी उडते. विचार करा तोच सिंह अचानक समोर आला तर काय होईल? वाघ, सिंह, बिबट्या, जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात. त्यांच्याशी वैर घ्यायला बाकीचे प्राणीही घाबरतात. त्यामुळे सहसा त्यांच्याशी पंगा घेण्याचं इतर प्राणी टाळतात. कारण हे धोकादायक प्राणी खूप शक्तिशाली असून क्रूर शिकारीही असतात. कधी कोणावर हल्ला करतील आणि फडशा पाडतील कोणीही सांगू शकत नाही. मात्र हा पठ्ठ्या चक्क रिंगणात सिंहाशी भिडलाय. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही रिंगणात दोन व्यक्तींना एकमेकांशी दोन हात करताना पाहिलं असेल. मात्र कधी एखाद्या सिंहाला व्यक्तीशी रिंगणात भिडताना पाहिलंय का? सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सिंह अगदी माणसासारखाच व्यक्तीशी फाईट करत आहे. रिंगणामध्ये एक सिंह आणि व्यक्ती एकमेकांशी फाईट करत आहेत. सिंह माणसाप्रमाणेच त्या व्यक्तीशी दोन हात करतोय. कधी सिंह त्याला मागे टाकतो तर कधी व्यक्ती सिंहापेक्षा जास्त सरस ठरताना दिसतो. एक वेळ अशी येते की तो सिंहाला उचलून खाली फेकतो, पण सिंह सुद्धा हार मानत नाही आणि लगेच उभा राहून पुन्हा व्यक्तीला खाली पाडतो. या व्हिडीओचा शेवट पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल..

हा व्हिडिओ १९३० च्या दशकातील असल्याचं सांगण्यात येत आहे. @historyinmemes नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इंटरनेटच्या आधी लोक काय करायचे असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वाहतूक पोलिसाच्या ‘या’ कृतीनं सर्वांचीच मने जिंकली! विनाहेल्मेट दुचाकीवरुन जाणाऱ्या वृद्ध जोडप्याला पोलिसांनी अडवले अन्…

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत. व्हिडीओला आतापर्यंत हजारोंमध्ये व्ह्यूज गेले आहेत.  वन्य प्राण्यांचे मजेशीर, हल्ल्याचे, धोकादायक, भयंकर, असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart stopping video of man face to face with lion in arena viral video srk