Father son Viral post: बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत असलं तरी ते नातं मुळापासून नेहमी घट्ट असतं. मुलं जशी मोठी होतात तसं त्यांना हळूहळू त्यांची आर्थिक जबाबदारी समजत जाते, त्याला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा पदरही असतो. आपलं ध्येय गाठण्याच्या ओघात कळत – नकळत त्यांचं घराकडे, घरच्या माणसांकडे दुर्लक्ष होत जातं. अशाच स्वत:ला कामात, जबाबदारीत गुंतवून घेतलेल्या वडिलांना जेव्हा मुलाच्या आधाराची गरज असते तेव्हाच जर तो ऐन तारुण्यात वाईट वळणाला गेला तर काय होतं असेल विचार करा.

वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाही तर त्याचा परिणाम पुढे मुलांवर होतो. मुलांनी चांगलं वागावं कधीच कोणाचा अपमान करू नये, त्यांना चांगले काय वाईट काय यातील फरक कळावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र हीच मुलं जर चुकीच्या वळणाला गेली तर आई-वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाची राख-रांगोळी होते. अशाच एका मुलामुळे एका वडिलांवर ही वेळ आली आहे. मुलानं केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे या वडिलांवर आपल्याच पोटच्या मुलाविरोधात जाहीरात देण्याची वेळ आली आहे.

काय आहे जाहिरात

या जाहीरातीवर लिहलेला मजकूर पाहून तुम्हीही म्हणाल अशी वेळ कोणत्याच वडिलांवर येऊ नये. या जाहीरातीवर “माझा मुलगा दीपक बाळू मोरे वय वर्ष २२, रा. प्रभाकर वस्ती, बुधवार पेठ. सोलापूर हा वाईट लोकांच्या संगतीने बिघडला असून, लोकांकडून उधार उसनवारीचने पैसे घेणे, दारु पिणे, जुगार खेळणे आदी व्यसनात गुरफटला आहे. या अगोदरही अनेकांकडे केलेली उधार उसनवारी आणि व्याजाने घेतलेले पैसे आम्ही अनेकपट रक्कम देवून फेडली आहे. परंतु आता त्यांनी घेतलेल्या रकमेची अथवा केलेल्या व्यवहाराची जबाबदारी आमची राहीली नसून यापुढे कोणीही त्याच्याशी आर्थिक व्यवहार करु नये. केल्यास त्याची जबाबदारी वडील या नात्याने माझ्यावर अथवा माझ्या परीवारातील सदस्यांवर राहणार नाही याची नोंद घ्यावी. ही जाहीर नोटीस दिली.” असा मजकूर लिहला आहे.

पाहा जाहीरात

हेही वाचा >> खतरनाक! पुणेरी पाटी सोडा “ही” कोकणी पाटी पाहा; कचरा टाकणाऱ्यांना दिली अशी धमकी की PHOTO पाहून पोट धरुन हसाल

प्रत्येक वडिलांनी नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा. ही जाहीरात सोशल मीडियावर lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. ही जाहीरात वाचून नेटकरीही भावूक झाले आहेत. तर अनेकांनी वडिलांवर ही वेळ आणल्यामुळे या मुलावर टीका केली आहे. एकानं म्हंटलंय की, “भावा संस्काराचा विषय केला म्हणून तुला कमेंट्स करत आहे … कोणत्याच बापाला वाटत नाही आपला मुलगा वाया जावा. प्रत्येक बापाला वाटत आपला मुलगा चांगला व्हावा. शेवटी माय बाप असतात आणि ही वेळ जर या बाबांवर असेल तर त्यांनी योग्य केलं आहे.” तर आाणखी एकानं “कोणताच बाप मुलावर वाईट संस्कार करत नाही मुलगा मोठा झाला की त्याला चांगलं वाईट कळाल पाहिजे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.