सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यात तरुण जोडपे बाईक राईडचा आनंद लुटताना दिसतात. काही व्हिडीओमध्ये मुली चक्क मुलांसारखं बुलेट चालवताना दिसतात. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात एका वृद्ध जोडप्याला मोपेडवरून प्रवास करताना पाहिलं…चक्क आजी मोपेड चालवत होत्या आणि त्यांचे पती मागच्या सीटवरून बसून बायकोच्या ड्रायव्हिंगचा आनंद घेताना दिसत होते. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होते! हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “याला म्हणतात खरं प्रेम!”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर या व्हिडीओचं वैशिष्ट्य म्हणजे जिथे बाईकचं हॅंडल कायम पुरुषांच्या हातात दिसत होतं. पण आता पुरूषांच्याही बरोबरीने महिला सुद्धा बुलेटसारख्या मोठमोठ्या बाईक बिनधास्त चालवताना दिसतात. असाच हा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये एक आजी मोपेड चालवताना दिसतात. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आजींचे पती मोपेडवर मागच्या सीटवर बसलेले दिसून आले. हे अप्रतिम दृश्य देश बदलत असल्याचं संकेत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : बाप रे बाप! शिंगे असलेला साप….VIRAL VIDEO पाहून आश्चर्यचकित होऊन जाल!

हा व्हिडीओ फोटोग्राफर सुष्मिताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “कपल गोल्स. सहसा आपण बाईकवर एक जोडपे पाहतो, पम नेहमी बाईक चालवणारा मुलगाच असतो. तुम्ही कधी असं काही पाहिले आहे का?” देशात साधारणपणे फक्त महिलाच मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसलेल्या दिसतात. जेव्हा म्हातारपणात मात्र असे दृश्य दुर्मिळच दिसून येतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ग्राहकाला पार्सल देण्यासाठी ट्रेनच्या मागे धावला डन्झो एजंट…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शाळेत विद्यार्थ्यांसोबत माकडही गिरवतंय शिक्षणाचे धडे, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

हा प्रेमळ व्हिडीओ सर्वांनाच आवडला आहे. हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नाही. एकदा पाहिल्यानंतर लोक वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३.९ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून लोक यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. “खूप क्यूट”, “आजीचा स्वॅग किती मस्त दिसतोय”, “हे खरं प्रेम आहे!”, “काळाबरोबर नातं असंच घट्ट होत जातं. ” अशा अनेक प्रतिक्रिया यावर व्हिडीओवर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart touching clip elderly woman rides moped with husband seated behind her prp