Heart touching letter to Daughter from father: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर.बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो.लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. मात्र दुसरीकडे एक भयानक वास्तवही नाकारुन चालणार नाही ते म्हणजे क्षणिक प्रेमासाठी वडिलांचा विचार न करता अनेक मुली निघून जातात. अशावेळी काय होतं असेल त्या आई-वडिलांचं? सध्या सोशल मीडियावर वडिलांचं एक पत्र व्हायरल होतंय, हे वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.

नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.

घर सोडून गेलीस की बाप मारुन गेलीस?

सगळे घरात असुन सु्द्धा एकटीच पोरगी बघत असते अंथरुन घेऊन अगावरती मोबाईलमध्ये जागत असते. जेवलीस का झोपलीस का याच्या पलीकडे काय असते काळजी घेऊन सांगा तिला पोरी हे प्रेम नसतं

अहो मेंढ्याच्या कळपासारखे कोळपे इथे फिरत आहेत
कोचिंग एखाद्या ठिकाणी पोरगी जेवणाचे पैसे भरत आहे

आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो
लहानपणी पोरी सारखी पोरी सोबत बाप रांगत असतो

पट्टीपासून डोळ्यांवरती पोरी प्रेम कसं केलं
घर सोडून जाण्याचं खुळ डोक्यात कसं गेलं

आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे बघत नाही
तू घरातून गेल्यापासून बाप सुद्धा जगत नाही

अरे लहान होतीस तेव्हा तुझा हात धरुन चालायचा
तू झोपी गेल्यावर फक्त एकटा तुझ्याबरोबर बोलायचा

पण पळून गेली पोरी तू हे काय करुन गेली
अगं घर सोडून गेलीस की बाप मारून गेलीस…

वाचा पत्र

हे पत्र सोशल मीडियावर kiran_dilwale_6922 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हे पत्र पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.