“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”, ही म्हण तुम्ही ऐकली असेल. या म्हणीचा अर्थ असा की, एखादा व्यक्ती कितीही श्रीमंत असो त्याच्याकडे आई नसेल तर भिकारी असतो कारण कितीही संपती असली तो आईची माया विकत घेऊ शकतं नाही. आई आणि बाळाचं नातं जगातील सर्वात सुंदर नातं आहे. आपल्या लेकरांसाठी आई जगातील सर्व संकटांशी लढायला तयार असते. जी माया आणि प्रेम एक आई करते ते जगात दुसरं कोणीही करू शकतं नाही. परिस्थिती काही असली तरी आई आपल्या मुलाचं रक्षण करते. आई आणि मुलांचं हेच नातं दर्शवणारा एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकाऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.

व्हायर व्हिडीओने जिंकले नेटकऱ्यांचे मन

@ChapraZila नावाच्या एक्स(पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या १५ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, आई रस्त्याच्या कडेला आपल्या लेकराला मांडीवर घेऊन बसली आहे. आपल्या बाळाबरोबर ही आई संवाद साधताना दिसत आहे. त्याचे लाड करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. महिलेच्या कपड्यांवरून ती गरीब असल्याचे दिसते. बहुधा ही महिला रस्त्यावरच राहत असावी. परिस्थिती कशीही असली तरी आई आपल्या लेकरावर नेहमी प्रेम करते. व्हिडिओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा – थरारक! भरपावसात चालत्या कारवर अचानक कोसळला विजेचा खांब, थोडक्यात बचावले प्रवासी, Video Viral

हेही वाचा – Assam Floods : वासराला वाचवण्यासाठी व्यक्तीने थेट पुराच्या पाण्यात मारली उडी, Viral Videoमध्ये थरारक दृश्य कैद

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला शेअर व्हिडीओला “गरीब आईचा राजकुमार” असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडीओवर एका नेटकऱ्यांनी कमेंट केली, “आई कधीच गरीब नसते सर.” त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, “कोणतीही आई गरीब नसते.” तर दुसऱ्या युजरने व्हिडीओवर कमेंट केली, “जगातील सर्वोत्तम व्यक्ती ही आई आहे.”

Story img Loader