आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी जसं दिवसरात्र एखादा बाप मेहनत करत असतो, तशीच आईदेखील संसाराला हातभार लावण्यासाठी घरातलं काम करून जॉबसाठी घराबाहेर पडते. लेकरांना घरी ठेवत आपल्या काळजावर दगड ठेवून ती घराबाहेर पडते. कामावरून घरी लवकर येऊन कधी आपल्या मुलांना बघतेय या विचारतच तिचा दिवस जातो. अशा आईच्या मुलांनादेखील दिवसभरात तिची उणीव भासते. तिच्या आठवणीने चिमुकल्यांचा जीव कासावीस होतो. आईला संध्याकाळी आपल्या डोळ्यासमोर पाहिलं की त्यांचादेखील जीव भांड्यात पडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकला आपल्या आईला कामावरून घरी परत येण्यासाठी विनवणी करताना दिसत आहे.

हेही वाचा… पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर आता पाचव्यांदा होणार आई, सोशल मीडियावर VIDEO शेअर करत दिली गुड न्यूज, पण सचिन म्हणाला…

चिमुकला करतोय आईला विनवणी

सोशल मीडियावरील चिमुकल्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. या व्हिडीओमध्ये आपल्या आईला कामावर जाताना पाहून एक लहान मुलगा रडताना दिसत आहे. तसंच तिला घरी लवकर येण्यासाठी विनवणीदेखील करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लहान मुलगा म्हणतो, “आई उशीर नको करूस लवकर घरी ये, तूच तुझ्या तोंडाने सांग की तू लवकर घरी येशील प्लीज”, चिमुकला आईला कळकळीची विनवणी करत रडताना दिसतोय.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/priti_tuzi_mazi_10/reel/DDvpYaCoCbJ/

हा व्हिडीओ @priti_tuzi_mazi_10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सकाळी आपल्या काळजाच्या तुकड्यांना सोडून कामावर जाणाऱ्या आईला घरी लवकर येण्यासाठी किती तळमळीने विनवणी करतात तिची मुलं… असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी भावूक होऊन यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हृदयस्पर्शी, मजबुरी, खूप वाईट असते.” तर दुसऱ्याने “मुलाची तळमळ बघून अक्षरश: डोळ्यात पाणी आलं” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “प्रत्येक नोकरी करणाऱ्या आईला असाच संघर्ष करावा लागतो”, “खूप वाईट वाटतं ताई, पण जबाबदारीपुढे काही पर्याय नसतो” अशी एकाने कमेंट केली.