Viral video: ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो.

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. पण याच उलट जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा तेसुद्धा आपल्याला दु्प्पट मिळतं. मग आनंद असो वा दुख: आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला मिळतं, याचं ताजं उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका पोलीसाच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?

हा व्हिडीओ पाहताना सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की, हे पोलिस गरीबाला त्रास देत आहेत की काय. मात्र हे पोलिस दिवसभर रिक्षा चालवून थकलेल्या व्यक्तीला मदत करतात. ते त्याच्या रिक्षात बसतात आणि एका हॉटेलमध्ये घेऊन जातात. तिथे ते त्या गरीब व्यक्तीला पोलीस स्वत: घास भरवतात आणि ते सुद्धा खातात. यावेळी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि आनंद आहे त्याची किंमत कशाचीही करु शकत नाही. कधी कधी आपण नकळत केलेली मदत एखाद्याला मोठा आनंद देऊन जाते हेच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आमच्या मुलाचे लग्न…” पुण्यात मुलाला स्थळ आणणाऱ्यांसाठी पालकांनी घराबाहेर लावली भन्नाट पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही पोलिसांनी केलेली मदत पाहून युजर्स त्यांचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. त्यावर एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप छान काम.. जगाला अशाच चांगल्या व्यक्तींची गरज आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मन जिंकलंत!” आणखी एकाने कमेंट करून लिहिलेय, “धन्यवाद ! चांगलं काम केलं तूम्ही”