Heartwarming letter from a brave son to his martyred father: सोशल मीडियावर रोज वेगवगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ रडवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एका शहीद झालेल्या जवानाच्या लहान मुलानं लिहलेलं एक पत्र व्हायरल होतंय. यामध्ये त्यानं लिहलेला एक एक शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
शहीद जवानाच्या कुटुंबाचे आयुष्य अत्यंत कठीण आणि दुःखद असते. त्यांच्यावर अचानक कोसळलेल्या या दुःखामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. त्यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासोबतच, त्यांना प्रशासकीय कामांमध्येही अनेक अडचणी येतात. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही ते धीराने आणि संयमाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.शहीद जवान कुटुंबाचे प्रमुख असल्याने, त्यांच्या जाण्याचे दुःख आणि आर्थिक नुकसान यांच्यावर मोठे परिणाम करतात. कुटुंबाला आर्थिक मदत मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात. शहीद जवानाच्या कुटुंबाला त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याचा मोठा मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागतो. या दुःखातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी खूप कठीण असते. शहीद जवानांच्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पेन्शन आणि इतर मदतीसाठी प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी येतात.
“पप्पा मला माहितीये, तुम्ही आहात बघताय आमच्याकडे पण आम्ही तुम्हाला बघू शकत नाही. आता लवकर आम्ही तुमच्याशी बोलू शकणार नाही, तुमच्यासोबत खेळू शकणार नाही. पप्पा आम्ही तुमच्याकडे कधीच हट्ट करणार नाही कारण तुम्ही आता लवकर सुट्टीला येणार नाही. त्यादिवशी आम्ही तुम्हाला आगीत जाळले म्हणजे तुम्ही नक्कीच कोणत्या तर मिशनवर असणार. मी आणि अथर्व तुमच्या फोनची वाट बघून थकलो. मम्मी बाबा आणि आजोबा तुम्हाला फोन करायला सांगतो पण मला माहिती आहे, ते फोन करतच नाही. मामाचा फोन आल्यावर आम्ही मामाला पण सांगतो, की पप्पांना फोन करायला सांगा, यावर मामा पण सांगतो की फोन केला असता पण पप्पा फोन उचलत नाही. पप्पा तुम्ही आल्यावर आपण मम्मी बाबांना आणि आम्हाला सांभाळून घ्या. पप्पा इथे सगळीकडे तुमचे फोटो लावले आहेत, किती मस्त ना सगळे तुम्हाला ओळखतात. घरी येऊन तुमच्याबद्दल बोलत असतात, म्हणून तुम्ही लपून काम करताय ना. हो मी पण मोठा झाल्यावर तुमच्या सारखाच होणार, बंदुकीनं गोळ्या मारणार, पण माझ्याकडे बंदुकच नाही, तुम्ही येताना माझ्यासाठी एक बंदुक घेऊन या आणि मला गोळ्या मारायला शिकवा. मम्मी, हर्षद आणि माझी काळजी करु नका पप्पा.”
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ rajdhani__satara007 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.