inspirational-story: आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं दिसत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.

बापानी कष्ट करावं अन् पोरांनी मोल करावं!

एखादी गोष्ट पुर्ण करण्यासाठी अनेकजण शेवटपर्यंत जिद्दीने प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रत्येकाला यश मिळतचं असं नाही. ग्रामीण भागात पोलिस भरती आणि आर्मी भरती करणाऱ्य़ा तरुणांची संख्या अधिक आहे. प्रत्येकवर्षी स्वप्न साकार करणाऱ्या तरुणांचं सुध्दा प्रमाण अधिक आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा आर्मीचं ट्रेनिंग पूर्ण करुन आल्यानंतर त्याच्या वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला पाहून वडिलांना अश्रू अनावर झाले असून त्यांनी मुलाला कडकडून मिठी मारली आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, बारा महिन्याचे अफाट कष्ट, कष्टातून काढलेले दिवस, कंबरेचा त्रास तरी सुद्धा जिद्द सोडली नाही. आणि हा सोन्याचा दिवस आणला .काम सगळेच करतात हो पण या कामात आमचं हेच खरं समाधान जय हिंद जय भारत…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा Shocking! युपीमध्ये नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलीला जंगलात फेकले; २ दिवस पावसात राहूनही चिमुकली जिवंत

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा बाप-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader