Viral video: पोलीस अधिकारी होण्याच स्वप्न प्रत्येकाचं असतं. यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो, घरचेही यासाठी कष्ट करत असतात. कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे समाधान जास्त असते.आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आई मुलीला वर्दीमध्ये पहिल्यांदा पाहते आणि मुलगी आईला पहिल्यांदाच वर्दीमध्ये सलाम करते. यावेळी माय-लेकीची झालेली भेट प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. आईच्या चेहऱ्यावरचे समाधान तसेच हा भावूक क्षण व्हायरल झाला आहे.हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलीचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.
आपल्या मुलाला किंवा मुलीला पोलिसांच्या वर्दीत पाहायचं अनेक आई-वडिलांचं स्वप्न असतं. अशाच आई एका आईचं आपल्या लेकीला वर्दीत पाहायचं स्वप्न पूर्ण झालंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही व्हिडीओतील आईसह मुलीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगी आईला पहिल्यांदा वर्दीमध्ये सल्युट करत आहे, यावेळी आईला अश्रू अनावर झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! रेल्वेमध्ये चहा कसा तयार केला जातो पहा; किळसवाणा VIDEO व्हायरल
मायेच्या सावलीत लेकरांना लहानचं मोठ करायचं आणि मग जगाच्या खड्ड्यात त्याला पडताना पाहणं पालकांसाठी कठीण असतं. पण या खड्ड्यातून तो सुखरुप बाहेर येऊन त्याचं स्वप्न पूर्ण करतो तो क्षण आई वडिलांसाठी जगातील सर्वात अनमोल क्षण असतो. हा व्हिडीओ @maharashtra_police.unofficial या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.