‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ या उक्तीप्रमाणे जिद्द व मेहनत असेल तर कोणतेही काम साध्य होते. एक दिवस आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे अशी जिद्द ठेवून मारुती पवार यांनीही मेहनतीनं यश खेचून आणलं. मारुती पवार यांची पिएसआय पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच आईला भेटतानाचा क्षण सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा माय-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आई वडील मुलांना मोठं करण्यासाठी अनेक काबाडकष्ट करत असल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. काही वेळा मुलं मोठी झाल्यावर याची परतफेड करताना कसे वागतात हेही आपण पाहिलं असेल..तरीही आई आपल्या मुलांवर किती प्रेम करते हे सांगायची गरज नाही. तुमच्या प्रत्येक छोट्या गरजांची काळजी घेण्यापासून ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यापर्यंत, ती नेहमीच तुमच्याबद्दल विचार करत असते. मुलही आईच्या पदराआड सुखात असतात, पण हीच मुलं मोठी झाली की आपआपल्या मार्गानं निघून जातात. मात्र आई ही तिथेच असते. अशाच माय-लेकाच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
A Heart-Touching Reunion of two friends
Video : “ही दोस्ती तुटायची नाय” भांडण मिटल्यावर दोघी मैत्रीणी ढसा ढसा रडल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “म्हणून मैत्रीत गैरसमज नसावे”
Haldi Ceremony Viral Video
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
Young Man Breaks Down in Tears Over Girlfriend's Photo in New Car
Video : देवाघरी गेलेल्या प्रेयसीचा फोटो नवीन कारमध्ये ठेवला अन् ओक्साबोक्शी रडला, तरुणाचा व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
myra vaikul emotional
Video : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला मायरा वायकुळ झाली भावुक; रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई समोरून येत आहे आणि आईला आनंदाची बातमी सांगण्यासाठी मुलगा आईची वाट पाहत आहे. आई जशी येते तशी मुलगा आईला मिठी मारतो आणि उचलून घेतो. पीएसआय पदी निवड झाल्याची बातमी तो यावेळी आईला देतो आणि यावेळी आईनं त्याच्यासाठी आयुष्यभर केलेले कष्ट त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात, तर आईच्या कष्टाचं चीज केल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. दोघेही माय-लेक ज्या क्षणाची वाट बघत होते, जे स्वप्न पाहिलं होतं ते अखेर पूर्ण झालं होतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पियुष मिश्रा यांच्या ‘आरंभ है प्रचंड’ गाण्याचे बोल बदलून बनवलेलं ‘हे’ गाणं ऐकलं का? VIDEO पाहून पोट धरून हसाल

हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. आई-वडिलांनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत.

Story img Loader