Success story: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. अशाच एका संघर्ष करणाऱ्या तरुणाचा भाजी विक्रेता ते मुंबई पोलीस असा प्रवास थक्क करणारा आहे. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर कष्ट करावेच लागतात. आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण बाजारात भाजी विकताना दिसत आहे. यावेळी प्रचंड पाऊसही कोसळत आहे मात्र चार पैसे कमावण्यासाठी तरुण भर पावसातही काम करताना दिसत आहे. घरच्यांना मदत करताना हा तरुण एका बाजूला पोलीस भरतीची तयारी करताना दिसत आहे. त्याच्या याच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तरुणानं थेट मुंबई पोलीसात भरती होऊन दाखवलं आहे. या तरुणाचं नाव सचिन शिंदे असून याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “हरलेला डावही जिंकता येतो” १२वीला गणितात ३५ टक्के; पीएसआय अधिकाऱ्याची मार्कशीट व्हायरल
एखादी गोष्ट पुर्ण करण्यासाठी अनेकजण शेवटपर्यंत जिद्दीने प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रत्येकाला यश मिळतचं असं नाही. ग्रामीण भागात पोलिस भरती आणि आर्मी भरती करणाऱ्य़ा तरुणांची संख्या अधिक आहे. प्रत्येकवर्षी स्वप्न साकार करणाऱ्या तरुणांचं सुध्दा प्रमाण अधिक आहे. मात्र जो जिद्दीनं प्रयत्न करतो त्याला यश मिळतच हेही तितकंच खरं..