Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात.आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुलगा परिक्षेत पास झाल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीये. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा परिक्षा पास झाल्यानंतर मुलाच्या यशाचं कौतुक करण्यासाठी आई-वडिलही आले आहेत. यावेळी मुलाच्या यशाचे भागीदार हे त्याचे आई-वडिल असल्यानं आई-वडिलांनाही हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. दरम्यान यानंतर मुलगा येतो आणि आपल्या आई-वडिलांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होतो. आपल्या मुलाला पाहून आई-वडिलांना आपले अश्रू आनावर झाले आहेत. यावेळी बाप-लेक एकमेकांनी मिठी मारतात आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन देतात. तर मुलाचे मित्रही वडिलांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकताना दिसत आहेत..
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुण्यात नक्की चाललंय तरी काय? रस्त्याच्या कडेला लावलेला पुणेरी बॅनर पाहून सगळेच विचार करु लागले; VIDEO व्हायरल
“आयुष्यात एवढं मोठं तर नक्कीच होणार “आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडणार”
सोशल मीडियावर हा व्हिडीओ banking_katta_mh20 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओवर “आयुष्यात एवढं मोठं तर नक्कीच होणार “आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडणार” असं कॅप्शन लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आहे. या व्हिडीओवर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “आई बापाचं कर्ज आयुष्यभर जरी कष्ट केलं तरी फेडू शकणार नाही” “आई-वडिलांनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं” अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत.