Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा माय-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहिल्याच प्रयत्नात PSI

Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
Success Story Of Manoj Kumar Sahoo In Marathi
Success Story : यूपीएससी केली क्रॅक! पहिले आयएएस अधिकारी ज्यांना मिळाली प्रतिष्ठित पदावर नियुक्ती; वाचा, त्यांची गोष्ट
Shocking video of BAMS Student Attempts Bank robbery with Chilli Spray and air pistol in bhopal video viral on social media
विद्यार्थ्याचा प्रताप! मिरचीचा स्प्रे, एअर पिस्तूल अन्…, युट्यूब व्हिडीओ बघून घातला बॅंकेत दरोडा; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
A Swiggy delivery girl shares the 'hardest' aspect of her job.
“सर्वात अवघड गोष्ट म्हणजे…” स्विगी डिलिव्हरी गर्लने नोकरीबाबत केला खुलासा, पाहा Video Viral

आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. आई वडिलांच्या याच कष्टाची परतफेड करत काही मूल अशक्य असं काहीच नाही हे दाखवून देतात. अशाच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय पूर्ण करता येतं हे सिद्ध करुण दाखवलं आहे अतुल प्रकाश आडे यांनी. अतुल यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, लहानपणी वडिलांचे छत्र हरवले असताना देखील अतुल प्रकाश आडे एका सामान्य कुटुंबातून मेहनतीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे.

स्पर्धा परिक्षेच्या क्लासमध्येच ऑफिस बॉय म्हणून काम केलं

अतुल प्रकाश आडे हे मूळचे नांदेडचे, ११ वीला असताना वडिल गेले आणि घरची सगळी जबाबदारी अचानक त्यांच्यावर आणि भावावर आली. यावेळी त्यांनी सुरुवातीला पुण्यात एका कंपनीमध्ये काम केलं, मात्र गावाकडे आई एकटी कशी राहील, या काळजीनं ते परतले आणि पुढील शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. आणि हाच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला कारण, प्रकाश यांनी बारावीत यशवंत कॉलेज उमरीमधून प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी आपण काहीतरी करु शकतो हे त्यांना उमगलं आणि त्यांनी स्पर्धा परिक्षेकडे आपलं लक्ष वळवलं. नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ते परतले आणि त्याच्यांच गावातील अविनाश राठोड यांच्या स्पर्धा परिक्षांच्या क्लासमध्ये त्यांनी ऑफिस बॉय म्हणून जॉब करत करत अभ्यास केला. मधल्या काळात अचानक कोरोनाचं सकंट आलं त्यावेळी ते थोडे घाबरले मात्र अभ्यास सुरुच ठेवला. अखेर २०२३ ला अतुलला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि पहिल्याच प्रयत अतुल पोलिस उपनिरीक्षक झाले.यावेळी त्यांचा आणि त्यांच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अतुल यांनी त्यांच्या आईला मिठी मारली आहे यावेळी माऊलीच्या डोळ्यातील आनंदाश्रूच सर्वकाही सांगून जात आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video Viral: रिसॉर्टमध्ये तरुणाचा खतरनाक अपघात! पाठीचं हाड मोडलं, कंबरेलाही मार बसून भयानक शेवट…

आईनं पोराला शिकवलं आणि याचीच जाणीव ठेवत मुलानं कष्ट करुन यश मिळवलं. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.

Story img Loader