MPSC Success Story: आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. आई वडिलांच्या याच कष्टाची परतफेड करत काही मूल अशक्य असं काहीच नाही दाखवून देतात. अशातच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय पूर्ण करता येतं हे सिद्ध करुण दाखवलं आहे. आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
३ वर्षानंतर उधळला यशाचा गुलाल
सांगली जिल्ह्यातील, विसापूर तालुक्यातील विजय शिवाजी माळी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरिक्षक पदावर निवड झाली आहे. मात्र इथपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. कधी सुरक्षारक्षक, कधी भाजीपाला विकून तर कधी शेतमजुरी करून विजय यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवले. घरची परिस्थिती बेताची असताना देखील विजय यांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केले. पदवीचं शिक्षण होईपर्यंत विजय हे स्वत: काम करत होते. परिक्षेच्या तयारीसाठी विजय जवळ जवळ ३ वर्ष घरीसुद्धा गेले नव्हते. मात्र जिद्दीनं अखेर ३ वर्षानंतर विजय हे विजयाचा गुलाल घेऊनच परतले. गरीबीचे चटके सोसत असताना त्यांनी मिळवलेले यश हे गावकरी व तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
मेहनतीचं यशात रुपांतर
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुण बऱ्याच वर्षांच्या मेहनीतनंतर पीएसआय होऊन घरी आला आहे. यावेळी या तरुणाच्या आईला अश्रू अनावर झाले आहेत. मुलाची एवढ्या वर्षाची मेहनत आज यशात बदल्यानंतर आईलाही खूप आनंद झाला आहे. या आनंदाच्या भरात मुलानं चक्क आईला मिठी मारून उचलून घेतलं आहे. आपल्या आईने घेतलेल्या कष्टाचं आपल्याला चीज करता आलं असेच काहीसे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. आईनं पोराला शिकवलं आणि याचीच जाणीव ठेवत मुलानं कष्ट करुन यश मिळवलं. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Love letter: नवऱ्यानं बायकोला स्वत:च्या हातानं लिहलं पत्र! वाचून तुमच्याही डोळ्यात नकळत येईल पाणी
“जेव्हा मुलगा PSI होऊन घरी आला , आईचे अश्रू अनावर झाले आपल्या यशाचे सर्वात जास्त आनंद फक्त आईबाबांनाच होतो.” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. एखादी गोष्ट पुर्ण करण्यासाठी अनेकजण शेवटपर्यंत जिद्दीने प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रत्येकाला यश मिळतचं असं नाही. ग्रामीण भागात पोलिस भरती आणि आर्मी भरती करणाऱ्य़ा तरुणांची संख्या अधिक आहे. प्रत्येकवर्षी स्वप्न साकार करणाऱ्या तरुणांचं सुध्दा प्रमाण अधिक आहे.