Tikamgarh Hospital Viral Video : मध्य प्रदेशातील टिकमगढ येथून एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा त्याच्या आजारी वडिलांसाठी हातात सलानीच बाटली घेऊन हॉस्पिटलच्या बेडवर उभा असल्याचे दिसून येत आहे, कारण त्यावेळी हॉस्पिटलमध्ये सलाइनची बाटली ठेवण्यासाठी स्टँड देखील नव्हता. हे प्रकरण टिकमगढ जिल्हा रुग्णालयातील आहे.

हातात सलाइनची बाटली घेऊन उभा आहे मुलगा

एनबीटीच्या वृत्तानुसार, पप्पू अहिरवार गेल्या काही दिवसांपासून आजारी पडल्यानंतर जिल्हा रुग्णालयात गेले, जिथे त्याला दाखल करुन घेतले. उपचारादरम्यान त्याला आयव्ही चढवले. दरम्यान सलाइनची बाटली ठेवण्यासाठी स्टँड उपलब्ध नव्हता. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी त्याचा लहान मुलगा हातात सलाइनची बाटली ठेवण्यासाठी स्टँड घेऊन उभा होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की,”निरागस मुलगा त्याच्या आजारी वडिलांजवळ बसलेला नाही, तर त्याच्या वडिलांना लावण्यात आलेला सलाईन हातात घेऊन बेडवर उभा आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोंधळ उडाला. कारवाईची मागणी होऊ लागली. या प्रकरणात, टिकमगड जिल्हाधिकाऱ्यांनी विलंब न करता प्रकरणाची दखल घेतली आणि रुग्णालयाची अचानक तपासणी केली. या दरम्यान, जेव्हा त्यांना सुविधा नीट मिळत नसल्याचे आढळले तेव्हा त्यांनी सिव्हिल सर्जनकडे जाब विचारला.

व्हायरल व्हिडिओ येथे पहा

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांची मन भरून आले आहे. वडील आजारी आहेत आणि रुग्णालयाने मुलाच्या हातात सलाईनची बाटली दिली आहे. मध्य प्रदेशातील टिकमगढमध्ये, स्लाइन लावण्यासाठी साधे स्टँड देखील नाही, रुग्णालयाच्या नावाखाली एक मोठी इमारत आहे. २०२५मधील भारताची अवस्था या चित्रात दिसत आहे.

रुग्णालय व्यवस्थापनाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि दोषींवर कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वॉर्ड बॉय महेश वंशकर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, तर कामावर असलेल्या तीन स्टाफ नर्सला देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहेत.

अहवालानुसार, सिव्हिल सर्जन डॉक्टर अमित शुक्ला यांनी संपूर्ण प्रकरणात सांगितले की,”वॉर्ड बॉय रुग्णासाठी आयव्ही स्टँड आणण्यासाठी गेला होता. या दरम्यान कोणीतरी व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनी आरोप केला की,”हे रुग्णालयाची प्रतिमा खराब करण्यासाठी केले गेले.”