Shocking video: आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा प्रथितयश व्यक्तींच्या आत्महत्येच्या घटनांनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्याविषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की, त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सुचत नाही. अशातच एका तरुणानं गर्लफ्रेंडने फसवल्याने टोकाचा निर्णय घेतलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येतात तर कधी एकामागे एक अनेक दुःख येतात. पण, एक माणूस म्हणून आलेल्या प्रत्येक संकटावर मात करणं महत्त्वाचं आहे. दुःखात दिवस-रात्र होरपळणारीच माणसं एक दिवस यशाचे शिखर पार करतात. पण, त्यासाठी संयम राखणं महत्त्वाचं असतं. मात्र, अनेकदा काही जण आलेल्या दुःखावर मात करण्यास स्वतःला असमर्थ ठरवतात आणि जीवाचं काहीतरी बरं-वाईट करण्याचा विचार करतात. माणसाचा जन्म मिळणंही खूप मोठी गोष्ट आहे, हे बहुदा ते विसरून जातात. सोशल मीडियामुळे आजपर्यंत तुम्ही आत्महत्या करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आजकालचे तरुण-तरुणी काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाही की लगेच चिडचिड करतात, नाराज होतात. ज्यात कधी मनासारखी नोकरी किंवा कॉलेज न मिळणे किंवा आवडीच्या व्यक्तीकडून प्रेमात धोका किंवा नकार मिळणे अशा विविध गोष्टी असतात. परंतु, या सर्व गोष्टी आयुष्याचा भाग आहेत, त्या विसरून जाणं सहज शक्य नसलं तरीही अशक्य अजिबात नाही. यासाठी स्वतःच्या पालकांचा विचार न करता अनेक जण आत्महत्या हा पर्याय निवडतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील एका तरुणानं हेच केलंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण एका उंच धबधब्यावर उभा असतो,मात्र या तरुणाला पाहून तिथे असलेले सर्व पर्यटक आरडा-ओरड करत असतात.त्यानंतर काही वेळाने तो तरुण उंच धबधब्यावरुन खाली पाण्यात उडी मारुन स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न करतो.मात्र काही नाविकाने तरुणाचा जीव वाचवला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जिनं जन्म दिला त्या आईचा तरी विचार करायचा रे” तर आणखी एकानं “हल्लीच्या तरुणांचं खूप अवघड आहे” असं म्हंटलं आहे.

जीवापेक्षा मोठं काहीही नाही

आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या अडचणींमधून जात असतो. आर्थिक घटकांसोबत आपल्या मानसिक स्वास्थावरदेखील परिणाम होऊन मानसिक ताण येऊ शकतो. परिणामी डिप्रेशन, मूड स्विंग्स् अशा गोष्टी येणे ही सामान्य बाब मानली जाते. मात्र काहीही असले तरी आपल्या जीवापेक्षा मोठे काहीही नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.