विरहाच्या वेदना किती क्लेशदायक असतात हे आपण चांगलेच जाणून असतो. कधी प्रेमाचा विरह तर कधी मैत्रिचा विरह. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कारण मुक्या प्राण्यांना देखील विरहाचे दुख: असते हे दाखवून देणारा हा प्रभावी फोटो आहे आहे.

VIDEO : दोस्त असावा तर असा! तिच्यासाठी दोन दिवस तो रेल्वेरुळावर बसून होता

फेसबुकवर स्वामी विद्याधर यांनी एका जुना फोटो अपलोड केला आहे. हा फोटो खूपच बोलका आहे. मुक्या प्राण्यांच्या विरहाच्या वेदना सांगून जाणारा. भारताच्या एका राष्ट्रीय महामार्गावर हा फोटो काढला आहे. जंगलातून पकडलेले हत्ती दोन वेगवेगळ्या दिशांना निघाले आहे. एका ट्रकमध्ये असलेले हे हत्ती ट्रक थांबताच एकमेकांची सोंड पकडून निरोप देतात. कदाचित ही शेवटची भेट असेल यापुढे कधीच भेट होणार नाही असे म्हणून एकमेकांचा निरोप घेण्याचे हे छायाचित्र हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही.

VIDEO : पिंज-यातल्या पक्ष्यांना मुक्त करण्यासाठी तिने संग्रहालय विकत घेतले?

हे छायाचित्र नेमके कुठले हे समजत नाही. पण कादचित कोण्या वर्तमानपत्रातून ते फेसबुकर टाकले असावे असे दिसते. भारतात आजही मोठ्या प्रमाणात अनेक कामांसाठी हत्तीचा वापर केला जातो. जंगलातून पकडून आणलेल्या हत्तींचा अवजड कामासाठी वापर केला जातो. त्यांच्या या छळावर भाष्य करणारा हा फोटो आहे.

Story img Loader