मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या माराकेशला शुक्रवारी रात्री तीव्र भूकंपाचा धक्का बसला. यात दोन हजाराहून अधिक नागरिक ठार झाले असून, अ‍ॅटलास पर्वतराजीतील खेड्यांपासून माराकेशच्या ऐतिहासिक शहरापर्यंत अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. या भूकंपादरम्यानचे एक भयनाक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जे भुकंपाच्या आधीचा काही सेकंदाचा असल्याचं सांगितलं जातं आहे.

पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध असलेल्या माराकेश शहरात हा मोठा भूकंप झाला आहे. तर या शहरातील एका ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये भूकंपाआधीचे काही क्षण रेकॉर्ड झाले आहेत. ज्यामध्ये काही लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. व्हिडीओत काही लोक एका ठिकामी बसले असताना अचानक इकडे-तिकडे पळायला सुरुवात करताना व्हिडीओत दिसत आहेत. शिवाय या वेळी अनेक इमारत कोसळल्यामुळे हवेत धूळीचे लोट उडत असल्याचंही दिसत आहे. या शहरात सध्या बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेणं सुरू आहे. आतापर्यंत २००० लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर २०५९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी हजारांहून अधिक लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याची आकडेवारी गृहमंत्रालयाने जाहीर केली आहे.

Sensex falls 73 points on Nifty ends below 24800
ऐतिहासिक ७७,७०१ कोटींची विदेशी गुंतवणूक ऑक्टोबरमध्ये माघारी, सेन्सेक्स, निफ्टीच्या घसरणीत आणखी  विस्तार
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Clash between driver-officers in ST Agar
Video: एसटी आगारात चालक-अधिकार्‍यांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Bengaluru man trolled for attending work meeting on laptop during Durga Puja pandal visit
“हा मूर्खपणा थांबवा”, दुर्गापुजेदरम्यान लॅपटॉपवर मिटिंग करतेय ही व्यक्ती, Viral Video पाहून संतापले नेटकरी
student reveals his rent for room with attached washroom Rs 15 Viral Video
फक्त १५ रुपये भाड्याने मिळाली सिंगल रुम! Viral Videoमध्ये तरुणाचा दावा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Two Tigress Fighting Over Boundary Dispute
Video : थरारक… ‘त्या’ दोन वाघिणींमध्ये तुंबळ लढाई, पर्यटकांच्या डोळ्यासमोर…
air in Shivaji Nagar in Govandi is still bad
गोवंडीतील शिवाजी नगरमधील हवा आजही ‘वाईट’, वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढले
person Murder in Chinchwad,
VIDEO: चिंचवडमध्ये हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

हेही वाचा- फोटोग्राफरचा कॅमेरा घेऊन सिंह जंगलात पळाला, चुकून स्वतःचा असा अप्रतिम VIDEO बनवला की, पाहून तुम्हीही थक्क व्हाल

भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या अल-हॉज प्रांतात १,२९३ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर तरूदंत प्रांतात ४५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. हे दोन सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असून उत्तर आफ्रिकन प्रदेशात हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचं सांगितलं जात आहे. १२० वर्षांनंतर एवढा मोठा भूकंप झाल्याचे एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अयूब टुडाइट ने एसोसिएटेड प्रेसला सांगितले की, तो जिममध्ये मित्रांबरोबर व्यायाम करत असताना त्याला मोठा धक्का जाणवला. तो म्हणाला, “आम्ही लोकांना मरताना, पळताना आणि लहान मुलांना रडताना पाहिलं. हे आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हतं, या परिसरात २० जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत.”