कधी कधी नियती फार निष्ठुर बनते. कधी कोणाच्या हातून सुखाचे क्षण नियती हिरावून घेईल हे सांगता येत नाही. तिच्यापुढे कोणी काहीच करु शकत नाही. म्हणूनच नवीन जन्माला आलेल्या जुळ्या बहिण भावाची तिने कायमची ताटातूट करण्याचे ठरवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : गर्भवती महिलेसाठी पोलिसांची तीन तासांची पायपीट

लँडसी आणि मॅथ्यू या जोडप्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून मूल होत नव्हते. पण अखेर त्यांच्या आयुष्यात अनेक वर्षांनंतर ते सुखाचे दिवस आले. १७ डिसेंबरला लँडसीने जुळ्या मुलांना जन्म दिला. या दोघांनाही जगातील सारे सुख आपल्या दारी आले असेच वाटले. एक नाही तर देवाने आपल्या पदरात दोन गोंडस मुलं दिली याचे सुख लँडसी आणि मॅथ्यूला होते. पण त्यांचे सुख फार काळ टिकले नाही. कारण लँडसीने जन्म दिलेल्या मुलाचे हृदय फार नाजूक होते आणि हे मूल फार काळ जगू शकत नाही असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. या मुलांना जन्माला येऊन फक्त काहीच आठवडे उलटले होते. आपल्या दोन्ही मुलांच्या भविष्याविषयी अनेक स्वप्ने लँडसी आणि मॅथ्यूने पाहिली होती. दोघेही बहिण भाऊ मोठे झाले की कसे दिसतील कसे वागतील अशी एक नाही शंभर स्वप्नांनी लँडसी आणि मॅथ्यूचे दिवस चांगले जात होते. मात्र डॉक्टरांच्या निदानाने या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली . हे दोन्ही बहिण भाऊ फक्त काही तासांचे सोबती आहेत हे जेव्हा लँडसी आणि मॅथ्यूला कळले तेव्हा या बहिण भावांचे पहिले आणि शेवटचे काही क्षण कॅमेरात कैद करण्याचे त्यांनी ठरवले. कारण हा फोटो लँडसी, मॅथ्यूला आयुष्यभरासाठी पुरेसा ठरणार होता. त्यानी स्थानिक छायाचित्रकाराला विनंती करून आपल्या कुटुंबांचे शेवटचे काही फोटो काढून घेतले.

वाचा : ‘या’ कारणासाठी समारोपाच्या भाषणात ओबामांची धाकटी कन्या उपस्थित नव्हती

स्थानिक छायाचित्रकार लँडसी ब्राऊन हिने या जुळ्यांचे शेवटचे फोटो आपल्या कॅमेरात कैद केले. त्यानंतर काहीच वेळात विल्यिअम म्हणजे जुळ्या मुलाचा मृत्यू झाला. लँडसीने अनेक आनंदाचे क्षण आपल्या कॅमे-यात कैद केले. पण असा प्रसंग आपल्या कॅमेरात कैद करण्याची लँडसीची पहिलीच वेळ होती. तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.