सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून लोक भावूक होत आहेत. व्हिडीओत तीन जिगरी दोस्त मजा-मस्ती करण्यासाठी म्हणून नदीवर गेले होते. यावेळी ते तिघे एकमेकांना मिठी मारत आयुष्यभर असेच एकत्र राहण्याचे वचन देत होते. पण, पुढच्याच क्षणी त्यांच्याबरोबर जे काही घडले, ते पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल, यावेळी तिघांनी एकमेकांना मारलेली ती मिठी ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची मिठी ठरली. काळीज पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी असे म्हटले की, तिघांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते.

ते तीन जिगरी दोस्त नदीत उतरले; ज्यात दोन मुली आणि एक मुलगा होता. पण, पुढच्या क्षणी काय होणार याची त्यांना कल्पनाही नव्हती. व्हिडीओमध्ये तिघेही एकमेकांना मिठी मारून कायम एकत्र राहण्याचे वचन देत होते; पण दुसऱ्याच क्षणी नदीने असेही काही रौद्र रूप धारण केले की, तिघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इटलीमध्ये एका नदीला भीषण पूर आला होता. त्यावेळी हे तिघेही नदीच्या आत उंच दगडावर अडकून पडले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने नदी ओलांडणे खूप अवघड आहे हे त्यांना समजले. त्यानंतर ते तिघेही स्वत:चा बचाव करण्यासाठी एकमेकांना घट्ट धरून एका उंच दगडावर उभे राहिले.

घृणास्पद! रिक्षाचालकाने भररस्त्यात तरुणीबरोबर केले ‘असे’ कृत्य; Photo वर नेटिझन्सचा संताप, म्हणाले, “कारवाई…”

बचाव पथकाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, हे तिघेही नदीकाठच्या सुरक्षित अंतरापासून काही मीटर दूर होते; मात्र लाखो प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. तिघांपैकी एका मुलीने अग्निशमन दलाला मदतीसाठी फोन केल्याचे सांगितले जात आहे. माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. कारण- त्यापूर्वीच ते पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून गेले. बचाव पथकाने त्यांच्या दिशेने दोरी फेकली; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते त्यांच्या डोळ्यांसमोर पुराच्या पाण्यात बुडाले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

व्हिडीओ पाहणाऱ्या युजरने लिहिले, “त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो.” दुसऱ्या युजरने लिहिले, “त्यावेळी त्यांच्या मनात काय चालले असेल याची मी कल्पना करू शकत नाही.”

Story img Loader