सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ विनोदी असतात तर काही व्हिडीओ गंभीर स्वरूपाचे असतात. काही व्हिडीओ काही तरी शिकवून जातात तर काही आपल्याला भावूक करून जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने एका वृद्ध महिलेकडून स्ट्रॉबेरी विकत घेतल्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या शेवटी जे होत ते कदाचित तुम्हाला भावूक करू शकतो.
नक्की काय झालं?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला बॉक्समध्ये पॅक करून स्ट्रॉबेरी विकताना दिसत आहे. एक माणूस तिच्या जवळ आला आणि तिला विचारले की एका बॉक्सची किंमत किती आहे. ती पेटी प्रत्येकी ३ डॉलरची असल्याची माहिती दिली. त्या माणसाने लगेच सांगितले की तो सर्व बॉक्स विकत घेईन. वृद्ध महिला भारावून गेली होती. तिला तो माणूस पैसे देतो. ती वृद्ध महिला माणसाला बॉक्स द्यायला जाते तेव्हा तो त्या पेट्या घेत नाही आणि म्हणतो की, “तुम्हाला माहित आहे काय सुंदर आहे? स्ट्रॉबेरी ठेवा जेणेकरुन तुम्ही पैसे कमवू शकाल.”
(हे ही वाचा: तो कुत्रा आहे असं वाटतंय? मग हा Viral Video शेवटपर्यंत बघाचं!)
व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओ मूळतः इंस्टाग्राम वापरकर्ता Osito Lima ने शेअर केला होता. त्यानंतर ते Pubity नावाच्या पेजवर पुन्हा शेअर केला गेला आणि व्हिडीओ व्हायरल झाला. “मानवतेवरील विश्वास, रीस्टोर,” व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे.
(हे ही वाचा: डुकराच्या हृदयाचं मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण; रुग्णाला मिळालं जीवनदान!)
(हे ही वाचा: नागालँडच्या पर्वतांमध्ये पहिल्यांदाच दिसला क्लाउडेड बिबट्या, फोटो Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
आत्तापर्यंत व्हिडीओला तब्बल ३९.२ दशलक्ष लोकांनी बघितलं आहे. नेटिझन्सना हा दयाळूपणा आवडला आणि त्यांनी त्यांच्या गोड प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहल्या.