पोटाची भूक अशी गोष्ट आहे ज्यामुळे हे सार जग सुरु आहे कारण कोणालाही उपाशी राहता येत नाही. आपल्या आणि आपल्या कुटुंबाला दोन वेळचं जेवण मिळावे यासाठी प्रत्येक व्यक्ती संघर्ष करत असतो. अनेकदा आपण पाहतो की, लोक आवडीची भाजी मिळाली नाही म्हणून जेवत नाही, जेव्हा मर्जी होईल तेव्हा बाहेरचे अन्न खातात ज्यामुळे घरात बनवलेलं अन्न वाया जाते, अनेकदा लग्न -कार्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते…..पण अनेक लोकांना ना अन्नाची कदर असते ना भुकेची किंमत नसते. रोज पोटभर अन्न मिळाणाऱ्या लोकांना अन्नाची कदर नसते ज्यांना रोज उपाशी झोपावं लागते त्यांना विचारा, अन्नाची किंमत काय असते? भूक काय असते.? आपल्या समाजात अनेक गरीब लोक असे आहेत मिळेल ते अन्न खातात, नाही मिळाले तर ते उपाशी झोपतात. मन मारून स्वत: आयुष्य आनंदाने जगतात.

सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन-तीन मुलं रस्त्यावर खेळताना दिसत आहे. तेवढ्या एका चिमुकल्याचे लक्ष एका हॉटलेसमोर लावलेल्या पोस्टरकडे जाते, ज्यावर पंचपक्कवाने भरलेले ताटाचा फोटो दिसत आहे. चिमुकला पटकन पोस्टरजवळ जातो, क्षणभर त्या फोटोतील खाद्यपदार्थांकडे पाहतो. पोस्टरमधील प्रत्येक पदार्थाला हात लावतो. पटकन उचलून तोंडत टाकल्यासारखे करतो. पुन्हा वळून आपल्या मित्रांकडे जातो आणि खेळण्यात मग्न होतो. पोस्टरमध्ये खाद्यपदार्थ बघूनच तो आपले पोट भरतो. व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहे
चिमुकल्याने कोणाकडून काही मिळेल याची अपेक्षा देखील ठेवली नाही, आहे ती परिस्थिती स्वीकारून तो आनंदी देखील झाला.

हेही वाचा – कंडक्टरचा दयाळूपणा! रस्त्यावर पेन विकणाऱ्या वृद्ध व्यक्तीची मदत, Viral Video एकदा बघाच

us shocking video viral
निर्दयी बाप! कारवरील बर्फ साफ करण्यासाठी ३ महिन्यांच्या बाळाबरोबर केलं जीवघेणं कृत्य; धक्कादायक VIDEO व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
funny video the boys going on a scooty took the smoke lightly
रस्त्यावर धूरच धूर, तरुण स्कुटी घेऊन पुढे गेला अन् घडलं असं काही की…; Viral Video पाहून पोट धरून हसाल
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
Little Boy Dressed up as dada Kondke
घाबरलेल्या, वैतागलेल्या चिमुकल्या दादा कोंडकेचा VIDEO मनाला भिडला; हावभाव नाही तर डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फिदा
Shocking video Woman finds worms in chicken woman who ate chicken had larvae in her meal gave up meat after watching
आवडीने चिकन खाताय? अर्ध चिकन खाऊन झाल्यावर महिलेला आतमध्ये काय दिसलं पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Pune farmer desi jugaad video farmer jugaad to protect field from bird watch video
VIDEO: पुणेरी शेतकऱ्यानं पक्ष्यांनी ज्वारी खाऊ नये म्हणून केला भन्नाट जुगाड; एक रुपयाही खर्च न करता पिकांचं कायमचं संरक्षण
Farmer desi jugaad video farmer jugaad to protect maize field from pig watch funny video
VIDEO: शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; डुक्करांपासून संरक्षणासाठी खतरनाक जुगाड, आता डुक्कर काय माणूसही पळून जाईल

हेही वाचा – बापरे! क्षणार्धात अख्खा डोंगर कोसळला, सैरावैरा धावत सुटले लोक, काळजात धडकी भरवणारा Video Viral


इंस्टाग्रामवर komal1909gupta नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये गरिबी असे लिहिले आहे. . भूक आणि गरिबी किती वाईट असते हे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी कमेंट करत आहेत, व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “ज्याला पोटभर अन्न मिळत नाही त्याला विचारा अन्नाची किंमत, जेव्हा अन्न खाताना आपण नाटकं करत असतो पण या बिचाऱ्या लोकांनी आपले आयुष्य कसे घालवले असेल. देवा आयुष्यात सर्व काही दे पण कोणाला उपाशी ठेवू नको: दुसरा म्हणाला, :आयुष्यात गरीबी सारखी दुसरी कोणती शिकवण नाही”

Story img Loader