पोटाची भूक अशी गोष्ट आहे ज्यामुळे हे सार जग सुरु आहे कारण कोणालाही उपाशी राहता येत नाही. आपल्या आणि आपल्या कुटुंबाला दोन वेळचं जेवण मिळावे यासाठी प्रत्येक व्यक्ती संघर्ष करत असतो. अनेकदा आपण पाहतो की, लोक आवडीची भाजी मिळाली नाही म्हणून जेवत नाही, जेव्हा मर्जी होईल तेव्हा बाहेरचे अन्न खातात ज्यामुळे घरात बनवलेलं अन्न वाया जाते, अनेकदा लग्न -कार्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते…..पण अनेक लोकांना ना अन्नाची कदर असते ना भुकेची किंमत नसते. रोज पोटभर अन्न मिळाणाऱ्या लोकांना अन्नाची कदर नसते ज्यांना रोज उपाशी झोपावं लागते त्यांना विचारा, अन्नाची किंमत काय असते? भूक काय असते.? आपल्या समाजात अनेक गरीब लोक असे आहेत मिळेल ते अन्न खातात, नाही मिळाले तर ते उपाशी झोपतात. मन मारून स्वत: आयुष्य आनंदाने जगतात.
सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन-तीन मुलं रस्त्यावर खेळताना दिसत आहे. तेवढ्या एका चिमुकल्याचे लक्ष एका हॉटलेसमोर लावलेल्या पोस्टरकडे जाते, ज्यावर पंचपक्कवाने भरलेले ताटाचा फोटो दिसत आहे. चिमुकला पटकन पोस्टरजवळ जातो, क्षणभर त्या फोटोतील खाद्यपदार्थांकडे पाहतो. पोस्टरमधील प्रत्येक पदार्थाला हात लावतो. पटकन उचलून तोंडत टाकल्यासारखे करतो. पुन्हा वळून आपल्या मित्रांकडे जातो आणि खेळण्यात मग्न होतो. पोस्टरमध्ये खाद्यपदार्थ बघूनच तो आपले पोट भरतो. व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहे
चिमुकल्याने कोणाकडून काही मिळेल याची अपेक्षा देखील ठेवली नाही, आहे ती परिस्थिती स्वीकारून तो आनंदी देखील झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा