Udaipur Man Drags Dog Behind Bike :सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक माणूस बाइकवरून जात असताना एका श्वानाला त्याच्या गाडीला साखळीने बांधून ओढत असल्याचे दिसून आले आहे. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे आणि अनेक वापरकर्त्यांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

श्वानाला दुचाकीला बांधून ओढतोय हा माणूस

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर उदयपूर अपडेट्स नावाच्या पेजने शेअर केला आहे. फुटेजमध्ये, श्वानाला खडबडीत रस्त्यावर ओढत असल्याच दिसत आहे, तो मागे रक्ताचे डाग सोडून जात आहे. एक धाडसी महिला ताबडतोब हस्तक्षेप करते आणि त्या माणसाला थांबवण्यासाठी धावते. ती धाडसी महिला त्या माणसाला झापते आणि राग व्यक्त करते आणि तिला “आप पागल हो क्या, आप जानवर हो क्या?” (तू वेडा आहेस का? तू प्राणी आहेस का?) असे म्हणताना ऐकू येते. त्यानंतर कॅमेरा जखमीश्वानावर झूम करतो, ज्याचे पंजे ओढल्यामुळे रक्ताळलेले दिसतात. बाईक चालक त्वरित श्वानाच्या गळातील साखळी काढून टाकतो.

व्हिडिओच्या कॅप्शननुसार, ही घटना उदयपूरच्या बालीचा भागात घडली, जिथे स्थानिकांनी या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध केला. व्हिडिओमध्ये, तो माणूस “अरे जाने दो. लो, खोल दिया मैने. मत बनाओ व्हिडिओ” असे म्हणत असल्याचे ऐकू येते. (कृपया ते जाऊ द्या. मी साखळी सोडली आहे, व्हिडिओ रेकॉर्ड करू नका).

नेटकरी संतापले

या व्हिडिओमुळे नेटिझन्समध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे, अनेकांनी त्या माणसाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “महिला आणि तिच्या मुलाचा आदर करा. कर्म वाट पाहत आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद, मॅडम.” दुसऱ्या वापरकर्त्याने विनंती केली, “प्राणी क्रूरता कायद्याअंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “तुम्ही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा.”